रेल्वे साईनगर शिर्डी ते ढेहर का बालाजी दरम्यान २० उन्हाळी विशेष गाड्या, बघा वेळापत्रक

167

उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे साईनगर शिर्डी ते ढेहर का बालाजी दरम्यान २० साप्ताहिक उन्हाळी विशेष गाड्या चालवणार आहे.

(हेही वाचा -मुख्यमंत्र्यांचे आदेशही मुंबई महापालिका आयुक्त, प्रशासक पाळत नाही…कोणते आहेत ते आदेश जाणून घ्या!)

तपशील खालीलप्रमाणे आहेतः

गाडी क्रमांक 09740 साप्ताहिक अतिजलद उन्हाळी विशेष दि. २४.४.२०२२ ते २६.६.२०२२ पर्यंत दर रविवारी साईनगर शिर्डी येथून ०७.२५ वाजता सुटेल आणि ढेहर का बालाजी येथे दुसर्‍या दिवशी ०८.१० वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 09739 साप्ताहिक अतिजलद उन्हाळी विशेष दि. २२.४.२०२२ ते २४.६.२०२२ पर्यंत दर शुक्रवारी ढेहर का बालाजी येथून २१.२० वाजता सुटेल आणि साईनगर शिर्डी येथे दुसऱ्या दिवशी २०.३० वाजता पोहोचेल.

थांबे:

कोपरगाव, मनमाड, भुसावळ, हरदा, इटारसी, भोपाळ, शुजालपूर, उज्जैन, नागदा, रामगंज मंडी, कोटा, सवाई माधोपूर, दुर्गापुरा आणि जयपूर.

संरचना:

दोन द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान आणि ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह ब्रेक व्हॅन

आरक्षण:

पूर्णत: आरक्षित विशेष ट्रेन क्रमांक 09740 साठी विशेष शुल्कासह बुकिंग दि. २०.४.२०२२ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल. तपशीलवार वेळा आणि थांब्यांसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करावे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.