कल्याणमधून कर चोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जवळपास 90 कोटींच्या जीएसटीची चोरी केल्याचे उघड झाले आहे. जीएसटी क्रमांक काढण्यासाठी दिलेल्या मोबाईल आणि ई-मेलमध्ये फेरफार करुन स्वत:चा मोबाईल आणि ई -मेल वापरत दोघांनी 502 कोटी 42 लाख 78 हजारांचा घोटाळा केल्याचे समोर आले आहे.
आरोपी अटकेत
या व्यवहारातील 90 कोटी 43 लाख 70 हजार रुपयांचा वस्तू व सेवा कर राज्य शासनास न भरता फिर्यादी व शासनाची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने करण राव आणि आकाश संतोष आडागळे या दोन आरोपींना अटक केली आहे.
( हेही वाचा: न्यायव्यवस्थेवर टीका करणं संजय राऊत यांना भोवणार? )
असा केला घोटाळा
जीएसटी नंबर काढण्यासाठी कल्याणमधील किशन पोपट यांनी श्री कृष्णा इन्व्हेस्टमेंट या फर्मच्या नावाने जीएसटी नंबर काढण्यासाठी करण राव याला 13 हजार रुपये दिले होते. या प्रक्रियेसाठी किशन पोपट यांनी आपला मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी दिला होता. मात्र राजेश याने जीएसटी नंबर काढताना आपला मोबाईल क्रमांक आणि ई -मेल आयडी लिंक करत या अकाऊंटवरुन 502 कोटी 48 लाख 78 हजार रुपयांचे व्यवहार केले. सध्या या गुन्ह्याचा तपास करत पोलिसांनी राजेशसह आकाश आडागळे या आरोपीला कल्याण पूर्वेतील ज्योतीनगर परिसरातून अटक केली आहे.
Join Our WhatsApp Community