औरंगाबादमधील राज ठाकरेंच्या सभेला ‘या’ राजकीय संघटनांचा तीव्र विरोध

123

महाराष्ट्र दिनानिमित्त येत्या १ मे रोजी होणाऱ्या मनसेच्या औरंगाबादमधील जाहीर सभेकरता जोरदार तयारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून सुरू आहे. या संदर्भातील बैठक मंगळवारी राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर पार पडली. औरंगाबादेतील खडकेश्वर येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ही सभा आयोजित करण्यात आली असून या सभेच्या परवानगी करता निवेदनही सादर करण्यात आले आहे. मात्र राज ठाकरे यांच्या या सभेला अनेक राजकीय संघटनांनी कडाडून विरोझ केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी अद्याप या सभेला परवानगी दिलेली नसून आजही परवानगीपत्र, शहरातील विविध संघटनांचा विरोध आणि कायदा यासंदर्भात वरिष्ठांच्या बैठका सुरू असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे औरंगाबादमधील राज ठाकरेंची सभा होणार की नाही? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

(हेही वाचा -मनसेने आता पोलिसांना पाठवले असे पत्र)

वंचित बहुजन आघाडीसह पाच संघटनांनी राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला तीव्र विरोध केल्याची माहिती मिळतेय. राज ठाकरे यांच्या या सभेला परवानगी नाकारण्यात यावी, असे पत्र पाच संघटनांनी पोलीस आयुक्तांना पाठवले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी घोषणा केलेल्या १ तारखेच्या सभेला परवानगी मिळते का असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

या संघटनांचा राज ठाकरेंच्या सभेला विरोध?

1. वंचित बहुजन आघाडी .
2. प्रहार जनशक्ती संघटना
3. मौलांना आझाद विचार मंच
4. गब्बर ॲक्शन संघटना
5.ऑल इंडिया पँथर सेना
6. मुस्लिम नुमाइंदा काँऊन्सिल

मनसेने पोलिसांना असे केले निवेदन

दरम्यान, मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांची मंगळवारी भेट घेतली. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर या सभेसाठी जवळपास 7 लाख लोक येतील असा अंदाज मनसेने व्यक्त केला आहे. त्यामुळे दुपारी 4.30 ते रात्री 9.45 वाजेपर्यंत ही परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. आयुक्तांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेत, त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून स्टेज, अग्निशमन, वीजपुरवठा आदींची परवानगी घ्या, आम्ही निरीक्षण करू, असे आश्वासन दिले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.