देशभरात आता मशिदींवरील भोंग्यांचा विषय तापला आहे. राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांवरुन केलेले वक्तव्य आणि त्यानंतर देण्यात आलेला अल्टिमेटम याने सध्या राजकीय वातावरण तापले आहे. नुकतीच रामनवमी आणि हनुमान जयंतीला निघालेल्या शोभायात्रेवर दगडफेक झाली. या सर्वांचा परिणाम म्हणून आता मनसेने मशिंदीमध्ये सीसीटीव्ही लावण्याची मागणी केली आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मशिदींमध्ये सीसीटीव्ही आहेत का असा सवाल उपस्थित केला आहे.
मशिदींमध्ये सीसीटीव्ही आहेत का?
जवळपास सगळ्या मंदिरात सीसीटीव्ही लावेल आहेत. परंतु, मशिदींमध्ये सीसीटीव्ही आहेत का सर्वधर्मीय प्रार्थना स्थळात सीसीटीव्ही यंत्रणा का करु नये हे सर्व केल्यास अनेक चुकीच्या गोष्टींना चाप बसेल. तसेच, असे करण्यास कोणाचाही आक्षेप असण्याचे कारण नाही. सरकारने याची नियमावली बनवून त्याची कठोर अंमलबजावणी करावी अशी मागणी बाळा नांदगावकर यांनी केली आहे.
जवळपास सगळ्या मंदिरात CCTV लावले आहेत,परंतु मस्जिदीत CCTV आहेत का? "सर्वधर्मीय" प्रार्थना स्थळात CCTV यंत्रणा का करू नये?हे सर्व केल्यास अनेक चुकीच्या गोष्टींना चाप बसेल.तसेच असे करण्यास कोणाचाही आक्षेप असण्याचे कारण नाही. सरकारने याची नियमावली बनवून त्याची कठोर अंमलबजावणी करावी.
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) April 19, 2022
भोंग्यांबाबत केंद्राने धोरण बनवावं
बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना, संजय राऊत यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे. राऊत म्हणाले की, केंद्राने गोवंश हत्याबंदीचे उदाहरण देत पंतप्रधान मोदींनाही फटकारले. राऊत म्हणाले जसे गोवंश हत्याबंदीसाठी धोरण बनवले, पण काही राज्यांना अपवाद देण्यात आला. तशी दुटप्पीभूमिका न घेता एक राष्ट्रीय धोरण बनवून केंद्राने सर्वच राज्यांना दिलासा द्यावा. त्यांनी भोंग्यांबाबत राष्ट्रीय धोरण बनवा अशी मागणीदेखील केली आहे.
Join Our WhatsApp Community