२१ एप्रिल १६५९ : रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटीचा दिवस

3236
राज्याच्या राजकारणात नेहमी विचारला जाणारा प्रश्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संन्यास योगी समर्थ रामदास स्वामी यांची भेट झाली होती का? याविषयी अनेक मतमतांतरे आहेत. भेट झाल्याचे दाखले अनेक इतिहासतज्ज्ञ देत आहेत, मात्र भेट झाली नाही असे म्हणणारे केवळ शाब्दिक प्रमाण देत आहेत, परंतू अद्याप कुणीही ते सप्रमाण सिद्ध करू शकले नाही, हा विषय भेटीपुरता मर्यादित आहे रामदास स्वामी हे शिवरायांचे गुरु होते हे मात्र भेट झाल्याचे दाखले देणारेही सांगत नाहीत. त्याला कारणही तसे आहे, प्रसिद्ध इतिहासकार, समर्थभक्त सुनील चिंचोलकर यांच्या म्हणण्यानुसार, छत्रपती शिवाजी महाराज कायम विविध संतांच्या दर्शनाला जात असत, त्यांचे आशीर्वाद घेत असत, त्यांच्याकडून ज्ञान घेत असत, त्यातील एक रामदास स्वामी होते.

‘या’ पुस्तकात भेटीचा संदर्भ

वसंतराव वैद्य यांनी श्री शिव-समर्थ भेट नावाचे पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक चाफळच्या श्रीराम देवस्थान ट्रस्टद्वारे प्रसिद्ध करण्यात आले होते. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत, ‘शिवाजी महाराज आणि रामदास समर्थ यांची शिंगणवाडी बागेत भेट झाली. त्याजागी समर्थ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संगमरवरी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली व मंदिर बांधण्यात आले’ त्या निमित्ताने हे पुस्तक लिहून प्रसिद्ध होत असल्याचे चाफळच्या श्रीराम देवस्थान ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त रा. ना. गोडबोले यांनी नमूद केले आहे. हे पुस्तक 26 एप्रिल 1990 रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे.
shivaji maharaj letter
या पुस्तकात शिवाजी महाराजांनी समर्थांच्या 11 मारुतींपैकी प्रत्येक मारुती देवस्थानाला 11 बिघे जमीन दिल्याचे वैद्य यांनी लिहिले (पान क्र-10) आहे. इ. स. 1678 साली विजयादशमीच्या दिवशी चाफळच्या श्रीराम देवस्थानाला सनद दिल्याचेही ते लिहितात. पुस्तकाच्या शेवटी त्यांनी ही सनदही पूर्ण दिली आहे. त्यात ‘छ. शिवाजी महाराज यांनी श्रीसद्गुरुवर्य श्रीसकल तीर्थरुप श्रीकैवल्यधाम श्री महाराज श्रीस्वामी- स्वामींचे सेवेसी’ असा मायना लिहिला आहे.

समर्थांनी शिवरायांवर केलेले काव्य

समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातला पत्र-व्यवहार फार मौलिक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या वडिलांनी कळवले की, समर्थ रामदास आपल्या खोर्‍यामध्ये आलेले आहेत. चाफळखोर्‍यात त्यांनी राममंदिर बांधलेले आहे. तू त्यांची भेट घे आणि त्यांची मदत घे. हे ऐकून छत्रपती शिवाजी महाराज समर्थांना भेटण्यासाठी म्हणून चाफळला आले. समर्थ रामदास तिथे नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला भेटू इच्छितात हे कळल्यावर समर्थ रामदासांनी चौकशी केली, की सध्या महाराज कुठे आहेत. महाराज वाईला आहेत ही कळले आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना एक सुंदर पत्र समर्थ रामदासांनी लिहिले आणि समर्थ शिष्य दिवाकर गोसावी बरोबर वाईला पाठविले.
या पत्रातील काव्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे जे वर्णन केलेले आहे तसे वर्णन कोणत्याही काव्यात पाहायला मिळत नाही. पत्रात समर्थ रामदास लिहितात,
निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंत योगी ॥
नरपति हयपति गजपति । गडपति भूपति जळपति ।
पुरंदर आणि शक्ति । पृष्ठभागी ॥
यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत ।
पुण्यवंत नीतिवंत । जाणता राजा ॥
आचारशील विचारशील । दानशील धर्मशील ।
सर्वज्ञपणे सुशील । सकळा ठायीं ॥
धीर उदार गंभीर । शूर क्रियेसि तत्पर ।
सावधपणे नृपवर । तुच्छ केले ॥
देव धर्म गोब्राम्हण । करावया संरक्षण ।
हृदयस्थ झाला नारायण । प्रेरणा केली ॥
या भूमंडळचे ठायी । धर्मरक्षी ऐसा नाही ।
महाराष्ट्र धर्म राहिला काही । तुम्हा कारणे ॥
कित्येक दुष्ट संहारिला । कित्येकांसि धाक सुटला ।
कित्येकांस आश्रयो जाहला । शिवकल्याणराजा ॥
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.