कोकणातील विमान प्रवासासाठी कसे कराल बुकींग?

140

चिपी विमानतळावरून मुंबईला जायचे असेल तर आता एअर इंडियाच्या साईटवरून बुकींग बंद झाले आहे. त्याऐवजी या विमानतळासाठी सेवा देणाऱ्या अलायन्स एअर या कंपनीच्या वेबसाईटवरून तिकीट बुकिंग सेवा सुरु झाली असल्याची माहिती अलायन्स एअरचे अधिकारी समीर कुलकर्णी यांनी दिली.

एअर इंडियाने आपल्या साईटवरून बुकिंग बंद केले

चिपी विमानतळ सुरू झाल्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत त्यासाठी एअर इंडियाच्या साईटवर जाऊन तिकीट बुकिंग करता येत होते. पण एअर इंडिया टाटा कंपनानीने घेतल्याने एअर इंडियाने आपल्या साईटवरून बुकिंग बंद केले आहे. त्यामुळे अलायन्स एअर या कंपनीच्या साईटवरून सिंधुदुर्ग-मुंबई विमानप्रवासाचे तिकीट बुकिंग सुरू झाले आहे. www.allianceair.in अशी ही वेबसाईट असून या वेबसाईटवर तिकीट बुकिंग उपलब्ध असल्याची माहिती समीर कुलकर्णी यांनी दिली.

( हेही वाचा : कोरोना महामारीत 76 टक्के लोकांनी गमावल्या नोक-या; सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती उघड)

उडान योजनेअंतर्गत ३५ सीट्स राखीव असून त्यासाठी रु. २४२५/- तिकीट आहे. पण त्यानंतरच्या जागांसाठी आकारण्यात येणारा तिकीट दर कंपनीच्या दराप्रमाणे उपलब्ध असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. विमानाच्या वेळांबाबतही कुलकर्णी यांनी माहिती दिली. आठवड्यातून बुधवार, शुक्रवार आणि रविवार या तीन दिवशी सिंधुदुर्ग विमानतळावरून सकाळी ९.५५ वाजता विमान सुटेल. तर सोमवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार या दिवसांसाठी दुपारी १.५० वा. विमान सुटेल असे समीर कुलकर्णी यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.