दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम अधिकार्यांनी 6 कोटींहून अधिक किमतीचे हेरॉईन जप्त केले. सीमाशुल्क विभागाच्या पथकाने हेरॉईन तस्करीच्या एका मोठ्या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. हे हेरॉईन पावडरच्या स्वरूपात कॅप्सूलमधून आणले होते. या प्रकरणी युगांडाच्या नागरिकालाही अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर एनडीपीएस कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.
९९ ड्रग्स कॅप्सूल गिळलेल्या
या कारवाईत अटकेची कारवाई केल्यानंतर सीमाशुल्क पथकाने आरोपीची ९ दिवस चाचणी केली. त्यानंतर अटक केलेल्या आरोपीच्या पोटातून ९९ कॅप्सूल बाहेर आल्या. त्यापैकी ९२१ ग्रॅम पांढरी पावडर आढळून आली. ही पांढरी पावडर हिरोईन असल्याचे तपासात निष्पन्न झाले.अटक केलेला युगांडाचा प्रवासी ३० मार्च रोजी शारजाहमार्गे भारताकडे रवाना झाला होता. दुसऱ्या दिवशी 31 मार्चला ते इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 3 वर पोहोचले. ग्रीन चॅनल ओलांडल्यावर तिथे उपस्थित कस्टम टीमने त्याची आणि त्याच्या सामानाची झडती घेतली. मात्र काहीही संशयास्पद आढळले नाही. या विमान प्रवाशाविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. अटक करण्यात आली, आता पुढील तपास सुरू आहे. यापूर्वीही अशा तस्करीच्या घटना घडल्या आहेत का, याचाही शोध घेतला जात आहे.
Join Our WhatsApp Community