‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राची युद्धनौकेसह सुखोईवरून यशस्वी चाचणी

123
भारतीय संरक्षण क्षेत्रातील महत्वाच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी आयएनएस दिल्ली या युद्धनौकेवरुन करण्यात आली. हीच चाचणी हवाई दलातील सुखोई लढाऊ विमानातूनही करण्यात आली. आयएनएस  दिल्लीवरून ज्या युद्धनौकेला लक्ष्य करण्यात आले, त्यामध्ये त्या युद्धनौकेच्या चिंधड्या उडाल्या. तब्बल तीन हजार किलोमीटर प्रति तास एवढ्या प्रचंड वेगाने ब्रह्मोस क्षेपणास्त्र युद्धनौकेवर आदळले. जमिनीवरुन हवेत मारा करत हवेतून येणारे लक्ष्य भेदणाऱ्या संरक्षण प्रणालीला अशा वेगवान ब्रह्मोसचा वेध घेणे हे अत्यंत अवघड असल्याचे ब्रह्मोसची निर्मिती करणाऱ्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

ध्वनीच्या तीनपट वेगाने लक्ष्यभेद 

विशेष म्हणजे या ब्रह्मोस क्षेपणास्त्रावर स्फोटके नव्हती. नुसते वेगाने आदळल्यानेच युद्धनौकेला भगडाद पडले आणि त्यानंतर युद्धनौका बुडाली. जर क्षेपणास्त्रावर स्फोटके असती तर युद्धनौकेचा स्फोट होत आणि तिचे मोठे नुकसान झाले असते आणि युद्धनौका काही मिनिटातच बुडाली असती. ब्रह्मोस क्षेपणास्त्र हे आधीच नौदलाच्या विविध युद्धनौकांवर तैनात करण्यात आले आहे. रजपुत, तलवार, शिवलिक, कोलकता, विशाखापट्टणम, निलगिरी अशा युद्धनौकांवर हे ब्रह्मोस क्षेपणास्त्र तैनात आहे. आता दिल्ली वर्गातील युद्धनौकांवर ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रणाली बसवण्यात आली आहे, या वर्गातील आयएनएस दिल्ली युद्धनौकेवरुन चाचणी घेण्यात आली होती. अशा चाचण्या या युद्धनौकेच्या सरावाचा एक भाग असतात. यामुळे क्षेपणास्त्र हाताळण्याचा, वापरण्याचा, युद्धकालिन परिस्थितीला समोरे जाण्याचा नौसेनिकांना अनुभव मिळतोच पण त्याचबरोबर क्षेपणास्त्रांची गुणवत्ता सुद्धा तपासून बघितली जाते. ध्वनीच्या तीनपट वेगाने ३०० किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावरचा लक्ष्यभेद करण्याची ब्रह्मोस क्षेपणास्त्राची क्षमता आहे. यामुळे युद्धनौकांच्या मारक क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.