राज्यात पोलीस दलात मोठे फेरबदल

119

राज्यात भोंग्यावरून मोठ्या प्रमाणात वाद सुरू असताना राज्यातील पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. सतत चर्चेत राहणारे नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करून त्यांच्या जागी जयंत नाईकनवरे यांची नाशिकच्या पोलीस आयुक्त पदावर नेमणूक करण्यात आली आहे. त्याचबरोबर पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी अंकुश शिंदे यांची आयुक्तपदी वर्णी लागली आहे. मुंबईत देखील मोठ्या प्रमाणात बदल्या आणि पदोन्नती देण्यात आलेल्या आहेत. मुंबईचे महत्वाचे पद म्हणून ओळखले जाणारे गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त या पदावरून मिलिंद भारंबे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी सुहास वारके यांच्याकडे मुंबई गुन्हे शाखेची जबाबदारी देण्यात आली आहे.

( हेही वाचा : सदावर्तेंवरील पोलीस कारवाईमुळे जे. जे. मधील १२२ कर्मचाऱ्यांच्या अडचणी वाढल्या )

पोलीस उपायुक्त ते अप्पर पोलीस आयुक्त पदोन्नती देण्यात आलेले अधिकारी 

परमजित दहीया, निवा जैन, राजेंद्र माने, विनायक देशमुख, महेश पाटील, संजय गांधी जाधव, दीपक साकोरे, पंजाबराव उगले, श्रीकांत पाठक, दत्तात्रय शिंदे,

अप्पर पोलीस आयुक्त ते विशेष पोलीस महानिरीक्षक

लखमी गौतम, संदीप कर्णिक, सत्यनारायण, प्रवीण पडवळ, एस.जयकुमार, निशीत मिश्रा, सुनील फुलारी, दत्तात्रय कराळे, संजय मोहिते, सुनील कोल्हे, प्रवीण पवार, बी.जी. शेखर, संजय बाविस्कर, जयंत नाईकनवरे.

बदली करण्यात आलेले आयपीएस अधिकारी

दीपक पांडे, सुहास वारके, मिलिंद भारंबे, सुरेश मेकला, रवींद्र शिसवे, कृष्णप्रकाश, अंकुश शिंदे आणि वीरेंद्र मिश्रा

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.