एप्रिल महिन्याचा पंधरवडा सरल्यानंतर विदर्भातील उष्णतेची लाट अधिकच प्रखर होत चालली आहे. बुधवारी जगभरातील उष्ण शहरांच्या यादीत ब्रह्मपुरी, चंद्रपूर आणि अकोला पहिल्या तीन स्थानावर पोहोचले. ब्रह्मपुरी येथील 45.3 अंश सेल्सीयस कमाल तापमान जगभरात जास्त होते. त्याखालोखाल चंद्रपूर 45.2 आणि अकोला 44.9 अंश सेल्सीयस तापमानाला अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान मिळाले.
उष्ण शहरांच्या यादीत नोंद
तिन्ही ठिकाणी सरासरीच्या तीन ते चार अंशाने जास्त तापमानाची नोंद झाली. हे तिन्ही शहर मंगळवारी जगभरातील उष्ण शहरांच्या यादीत अनुक्रमे पाचव्या, सहाव्या आणि नवव्या स्थानावर नोंदवले गेले होते. मंगळवारी अकोल्यातील कमाल तापमान 44.8 अंश सेल्सीयस तर चंद्रपूरातील कमाल तापमानही 44.8 अंशावर होते.
मंगळवारी वर्धा जिल्ह्याला आठवे स्थान मिळाले. वर्धा जिल्ह्यात अकोला आणि चंद्रपूराएवढेच कमाल तापमान होते. त्यानंतर ब्रह्मपुरी स्थानकातील कमाल तापमान नोंदवले गेले. ब्रह्मपुरीत 44.7 कमाल तापमानाची नोंद झाली होती. मंगळवारी जगभरातील उष्ण शहरांच्या यादीत पहिल्या पंधरा शहरांच्या यादीत एकट्या भारतातील चौदा शहरे नोंदवली गेली.
Join Our WhatsApp Community