एसटी कर्मचा-यांना उच्च न्यायालयाने 22 एप्रिलपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. उच्च न्यायालयाने दिलेल्या या आदेशानंतर आता अनेक एसटी कर्मचारी कामावर रुजू होत आहेत. आतापर्यंत 91 टक्के कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. त्यामुळे लालपरीच्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. आता लालपरी पुन्हा एकदा जोमाने धावू लागली आहे.
प्रवाशांची गैरसोय थांबली
मागच्या पाच महिन्यांपासून एसटीच्या कर्मचा-यांचा संप सुरु असल्याने, एसटीच्या वाहतूकीवर खूप मोठा परिणाम झाला. पण आता मात्र लालपरी रस्त्यावर धावू लागल्याने, प्रवाशांची होणारी गैरसोय थांबली आहे. विशेषत: खेड्या पाड्यातील ग्रामीण भागातील लोकांसाठी खूप सोय झाली आहे. देशव्यापी लाॅकडाऊननंतर अनलाॅक काळात गाड्यांची वाहतूक पूर्वपदावर येत असतानाच, एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीसाठी संपावर गेले. त्याने लालपरी जागेवर थांबून राहिली. मात्र आता न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर, अनेक कर्मचारी कामावर परतले आहेत.
(हेही वाचा: धनंजय मुंडे यांची महिलेविरुद्ध पोलिसांत 5 कोटींची खंडणी मागितल्याची तक्रार! )