डेक्कन क्वीन नेहमीच चर्चेत असणारी गाडी आहे. काहीतरी नवीन संकल्पना घेऊन आपल्या प्रवाशांचे मनोरंजन करण्यासाठी डेक्कन क्वीन तयार आहे. मुंबई ते पुणे धावणा-या डेक्कन क्वीन एक्सप्रेसचा प्रवास आता अधिक माहितीपूर्ण आणि मनोरंजक होणार आहे. डेक्कन क्वीन पाठोपाठ दहा एक्सप्रेसमध्ये क्यूआर कोड स्कॅन करताच मनोरंजक माहितीचा खजिना खुला होणार आहे. नाॅन फेअर रेव्हेनू अंतर्गत हा उपक्रम मध्य रेल्वेने राबवला आहे.
असा घालवा वेळ मजेत
डेक्कन क्वीनने जर तुम्ही रोज प्रवास करत असाल, तर मोबाईलने क्यूआर कोड स्कॅन करताच, इन्फोटेन्मेंट उपलब्ध होणार आहे. तसेच, जर का प्रवाशांना जनरल नाॅलेज तपासायचे असेल किंवा प्रश्नमंजूषा खेळायची असेल तर ही सुविधा उपयोगी ठरणार आहे. प्रवाशांचा संपूर्ण वेळ अगदी मजेत जाण्याची हमी मिळणार आहे.
( हेही वाचा: वाहतूक नियम मोडाल तर याद राखा, मिळणार ही अजब शिक्षा )
आणखी दहा एक्सप्रेसमध्ये सुविधा
शाॅपिंगची ठिकाणे, विविध गेम्स, पुराणकाळातील प्रेम कथा ऐकायच्या असतील, रामायण आणि महाभारतातील कथा ऐकायच्या असतील तर तुम्हाला तुमच्या भाषेत हा चॅटबाॅट सर्व माहिती देणार असल्याने प्रवासाचा वेळ मजेत पार पडणार आहे. मध्य रेल्वेने गपशप्स या कंपनीच्या मदतीने गुगल असिस्टंट, अलेक्सा, सिरी याप्रमाणे चॅटबाॅटची सुविधा उपलब्ध केली आहे. डेक्कन क्वीनपाठोपाठ दहा एक्सप्रेसमध्ये आता ही सुविधा देण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community