मनसेचं ठरलं; ३ मे रोजी ‘भोंगा’ लागणारच

174

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या गुढीपाडव्याच्या सभेत मशिदींवरचे अजानचे भोंगे काढले नाहीत तर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावू, अशा आशयाचे वक्तव्य केले. यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारणात एकच खळबळ उडाली. मशिदींवरचे हे भोंगे हटवण्यासाठी राज ठाकरेंनी ३ मे पर्यंतचा अल्टिमेटमही दिल्याने ३ मे रोजी नेमकं काय होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. अशातच गुरूवारी मनसेने पत्रकार परिषद घेत यासंदर्भातील माहिती दिली.

मनसेच्या बहुचर्चित उत्तरसभेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. यानंतर आता पुन्हा एकदा मनसे चर्चेत येणार असल्याची चिन्ह आहेत. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी गुरूवारी सकाळीच एक ट्विट केले असून त्यांनी पत्रकार परिषदेची माहिती देत मोठ्ठा आवाज होणार आहे, असे म्हटले आहे. त्यामुळे आता कोणता आवाज असणार याचा खुलासा मनसेने गुरूवारच्या पत्रकार परिषदेत केला आहे.

असे केले खोपकरांनी ट्वीट

(हेही वाचा – औरंगाबादेतील राज ठाकरेंच्या सभेसाठी पोलिसांनी दिला ‘या’ पर्यायी जागेचा प्रस्ताव)

https://twitter.com/MNSAmeyaKhopkar/status/1516972517784637441

मनसेकडून ३ मे रोजी भोंगा होणार प्रदर्शित

दरम्यान, मनसेकडून ३ मे रोजी भोंगा नावाचा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटाबद्दल बोलताना मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले, राज ठाकरे यांनी सातत्याने आपल्या भाषणातून भोंग्यांबद्दल भाष्य केले आहे. राज ठाकरे यांनी म्हटलं की , भोंगा हा धार्मिक मुद्दा नसून सामाजिक प्रश्न असून याच्या भोवती फिरणारा हा चित्रपट असणार आहे. चित्रपटात सामाजिक समस्येवर पूर्णपणे भाष्य करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. सामाजिक विचार सगळ्यांपर्यंत पोहचावे यासाठी हा चित्रपट ३ मे रोजी प्रदर्शित करण्याचे ठरवले आहे. हा चित्रपट २०१८ मध्ये तयार झाला होता. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.