महापालिका रुग्णालयांमधील रुग्ण आणि डॉक्टर्स यांचे दैनंदिन कपडे धुण्यासाठी टनेल लाँड्री या अत्याधुनिक पध्दतीचा वापर केला जाणार असून अशाप्रकारच्या अत्याधुनिक टनेल लाँड्रीची व्यवस्था करणारी देशातील पहिली महापालिका ठरणार आहे. परंतु यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये महापालिकेने अंदाजित केलेल्या दरापेक्षा १० ते १२ टक्के अधिक कामाची बोली लावण्यात आली आहे. त्यामुळे १६० कोटी रुपयांच्या तुलनेत १७४ कोटी रुपयांची बोली लावण्यात आली असून डिपार्टमेंट स्टोअर्स या कंपनीने बोली लावली आहे. महापालिकेच्यावतीने प्रथमच अशाप्रकारची टनेल लाँड्री बसवली जात असल्याने या डिपार्टमेंट स्टोअर्सला याचा अनुभव आहे का याबाबतची छाननी आता महापालिका प्रशासनाच्यावतने सुरु आहे.
( हेही वाचा : सावधान! मुंबईत या 74 ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका, सर्वेक्षणातून माहिती उघड )
महापालिकेला कल्पनाच नव्हती
मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमधील रुग्णांसह डॉक्टरांच्या दैनंदिन कपडे धुण्यासाठी असलेल्या परळ मधील धुलाई केंद्रांवरील ताण लक्षात घेता ५० टक्के कपडे याठिकाणी धुतले जातात. तर उर्वरीत ५० टक्के कपडे खासगी धुलाई केंद्रातून धुतले जातात. त्यामुळे महापालिकेने आता अत्याधुनिक पध्दतीने कपडे धुण्यासाठी टनेल लाँड्री पध्दतीचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी महापालिकेच्या यांत्रिक व विद्युत विभागाच्यावतीने निविदा मागवण्यात आली होती. या टनेल लाँड्री प्रकल्पासाठी १६० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरून निविदा मागण्यात आली होती.
त्यानुसार, मागवलेल्या निविदेमध्ये तीन कंपन्यांनी भाग घेतला आहे. यामध्ये कमीत कमी बोली ही १६० कोटी रुपयांच्या तुलनेत परिचय डिपार्टमेंट स्टोअर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने लावली आहे. या कंपनीने सुमारे १७५ काटी रुपयांची बोली लावल्याची माहिती मिळत आहे. त्याखालोखाल स्वाय इंडिया प्रायव्हेट लिमिटे व औरा फॅसिलिटी मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्यांनी सुमारे १८६ आणि १९२ कोटी रुपयांची बोली लावल्याचीही माहिती मिळत आहे. त्यामुळे महापालिकेच्यावतीने प्रथच हा प्रकल्प राबवला जात असून याबाबत कोणतेही ज्ञान तथा अनुभव नसताना मागवलेल्या या निविदेमध्ये सुमारे १४ ते १५ कोटी रुपये अधिक बोली लावण्यात आली असून या कंपनीने यापूर्वी अशाप्रकारचे काही काम केले आहे याबाबतची कल्पनाच महापालिकेला नाही.
पात्र कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आलेली नाही
याबाबत यांत्रिक व विद्युत विभागाचे प्रमुख अभियंता कृष्णा पेरेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आवश्यक सर्व पाकिटे खुली करण्यात आली असली तरी पुढील सर्व निविदा प्रक्रिया सुरु आहे. अजून पात्र कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली नसून ज्या कंपनीने कमी बोली लावली आहे, त्यांच्या कागदपत्रांसह सर्व बाबींची छाननी करण्याचे काम शिल्लक आहे. त्यानंतरच निविदा अंतिम केली जाईल,असे स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community