राज्यातील प्रवेशपूर्व परीक्षा ढकलल्या पुढे; जेईई मेन होणार जून-जुलैमध्ये

149
केंद्रातील अभियांत्रिकी, तंत्रज्ञान अभ्यासक्रमांच्या संयुक्त प्रवेशपूर्व परीक्षा (जेईई मेन) आणि वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरता राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) ही परीक्षा जुलैमध्ये होणार आहे. त्याचा परिणाम म्हणून राज्यातील प्रवेशपूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यात राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषि अभ्यासक्रमांच्या प्रवेश पूर्व परीक्षांचा समावेश आहे. या परीक्षा जूनमध्ये होणार आहेत. त्यामध्ये एमएचटी-सीईटी यांचा समावेश आहे.

एमएचटी-सीईटी परीक्षा ‘या’ तारखांना होणार 

आता एमएचटी-सीईटी ५ ते १८ ऑगस्ट दरम्यान होणार आहे, तर अन्य सीईटी ३ ते १९ जून या कालावधीत होणार आहे. जेईई आणि एनईईटी या दोन परीक्षा एकाच वेळी आल्या आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम हा महाराष्ट्राकडून घेण्यात येणाऱ्या एमएचटी- सीईटी परीक्षांवर झाला आहे. या परीक्षा लांबवणीवर पडल्या आहेत. यासंबंधीचे ट्विट उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले आहे. संबंधित परीक्षा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येईल, याबाबतचे संकेत देखील मंत्र्यांनी आपल्या ट्विटमधून दिले होते. तसेच, परीक्षाबाबतच्या तारखा लवकरच जाहीर करू, असेही त्यांनी सांगितले. वास्तविक एमएचटी सीईटी २०२२ ही परीक्षा ११ जून ते १६ जून दरम्यान होणार होती. पण जेईई मेन २०२२ ही परीक्षा देखील जूनमध्येच सुरू होणार आहे. त्याचबरोबर १७ जुलैपासून एनईईटी ही परीक्षा होणार आहे. या दोन परीक्षामुळे एमएचटी सीईटी परीक्षा लांबणीवर पडली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.