भायखळा येथील जेजे रुग्णालयात राज्यातील पहिले पल्मनरी रिहेबिलिटेशन सेंटर उभारले गेले आहे. गुरुवारी या केंद्राचे उद्घाटन झाले. बाह्रय रुग्ण विभागातील औषध विभागातच हे केंद्र सोमवार, बुधवार आणि शुक्रवार दुपारी २ ते ४ दरम्यान उपलब्ध राहील.
केवळ दहा रुपयांचा खर्च
सिप्ला या औषध निर्मिती कंपनीच्या सीएसआर फंडातून हे केंद्र जेजे रुग्णालयात सुरु झाले आहे. फुप्फुस कमकुवत असणा-या रुग्णांना औषध आणि व्यायाम करुन घेण्यासाठी हे केंद्र उभारले गेले आहे. सतत दम्याचा त्रास रुग्णांना, श्वसनाचा त्रास असणा-या रुग्णांना, क्रोनिक आबस्ट्रेक्टीव्ह पल्मनरी डिसीज, इंटरस्टिशीअल लंग डिसीज, बाँकायटीस संबंधी त्रास असलेल्या रुग्णांना या केंद्रातून उपचार दिले जातील, अशी माहिती श्वसन औषध विभागाच्या प्रमुख डॉ प्रिती मेश्राम यांनी दिली. या सेंटरला भेट देण्यासाठी केवळ रुग्णांना केसपेपरपुरता केवळ दहा रुपयांचा खर्च करावा लागेल, अशी माहितीही डॉ मेश्राम यांनी दिली. या सेंटरमध्ये जेजे रुग्णालयातील फिजिओथेअरपिस्ट रुग्णनिहाय फुफ्फुसांचे व्यायाम करवून घेतील. काही रुग्णांना व्यायाम घरी करुन केवळ फॉलोअपसाठी यावे लागेल. पल्मनरी रिहेबिलिटेशन केंद्रात टेलि कन्सल्टन्सीचीही सोय उपलब्ध करुन दिली असल्याची माहिती डॉ मेश्राम यांनी दिली.
( हेही वाचा : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा कधी मिळणार तिसरा हफ्ता? )
कोरोना काळानंतर श्वसनासंबंधातील आजारांमुळे कोविडबाधित अनेक रुग्णांना जीव गमवावा लागला होता. त्यामुळे श्वसनासंबंधातील आजाराशी झगडणा-या रुग्णांची फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढवावी म्हणून हे केंद्र उभारले गेले आहे. या केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ पल्लवी सापळे उपस्थित होत्या.
Join Our WhatsApp Community