वेळेत वेतन न मिळाल्यामुळे वडाळा, कुर्ला, बांद्रा बेस्ट आगारातील कंत्राटी कामगारांनी गुरुवार २१ एप्रिलला संप केला होता. यामुळे टाटा, केईएम रुग्णालयात जाणाऱ्या हजारो प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. बेस्टमध्ये कंत्राटी कॉन्ट्रॅक्टरच्या बस व कंत्राटी कामगार आणून, बेस्ट कामगार त्यांचे कुटुंब व बेस्टला संपवण्याचे भयंकर षडयंत्र सत्ताधारी पक्षाने आखलेले आहे असा आरोप भाजपच्या कामगार आघाडीने केला आहे.
( हेही वाचा : कोकण रेल्वे सुसाट! १ मे पासून ‘या’ गाड्या धावणार विद्युतवेगाने… )
बेस्टच्या शेकडो एकर जागेवर डोळा
कंत्राटदाराच्या कंत्राटी बसवरील कंत्राटी कामगारांचे वेतन (जवळपास पाच महिन्याचे) वेळेवर न दिल्यामुळे कंत्राटी बस कामगारांनी संप केला होता. बेस्ट चालवणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी बेस्ट कशी फायद्यात येईल हे बघायचे सोडून कॉन्ट्रॅक्टरच्या बस व कंत्राटी कामगार आणून स्वताचे खिसे कसे भरतील यासाठी बेस्ट नुकसान केले. यावरून हे लक्षात येते की, या सत्ताधाऱ्यांचा बेस्ट जगवण्यापेक्षा बेस्ट संपवून बेस्टच्या शेकडो एकर जागेवर डोळा आहे. आताच्या सत्ताधाऱ्यांची बेस्ट कधी कामगारांची झाली नाही, मग ती कंत्राटी कामगारांची कशी होईल. असा आरोप भाजपने केला आहे.
भाजप कामगार आघाडीचा विश्वास
“बेस्ट कामगारांनो स्वत:चे व कुटुंबाचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी सावध व्हा, यासाठी आपण सर्वांनी मिळून सत्ताधाऱ्यांचा कुटील डाव हाणून पाडण्यासाठी कामगार नेते सुनिल गुलाबराव गणाचार्यांना साथ देऊया ते आपल्या बेस्टचे व बेस्ट कामगारांचे नक्कीच भलं करतील” असा विश्वास भाजपच्या कामागार आघाडीने व्यक्त केला आहे.
Join Our WhatsApp Community