एक दरोडा असा पण…सिग्नल झाकले, रेल्वेची साखळी ओढली! वाचा मध्यरात्रीचा थरार

163

औरंगाबाद जिल्ह्यातील पोटूळ रेल्वे स्थानकाजवळ गुरुवारी मध्यरात्री देवगिरी एक्सप्रेसवर दरोडा टाकण्यात आला. दरोडेखोरांनी रेल्वे सिग्नलवर कपडा बांधून गाडी थांबवली. त्यानंतर तुफान दगडफेक करत सुमारे 10 जणांच्या टोळीने गाडीत प्रवेश केला. यावेळी प्रवाशांचे मोबाईल, पाकिटे, पर्स आणि महिलांचे दागिने लुटून नेल्याची माहिती एका प्रवाशाने दिली आहे.

( हेही वाचा : कोकण रेल्वे सुसाट! १ मे पासून ‘या’ गाड्या धावणार विद्युतवेगाने… )

तुफान दगडफेक

माहितीनुसार सिकंदराबाद-मुंबई एक्स्प्रेस औरंगाबादहून मनमाडला रवाना झाल्यानंतर दौलताबाद- पोटूळ स्थानकादरम्यान रेल्वे चालकाला सिग्नल बंद दिसले. दरोडेखोरांनी सिग्नलवर कपडा बांधला होता. रेल्वे थांबताच डब्यांवर तुफान दगडफेक सुरू झाली. यानंतर डब्यांमध्ये 9 ते 10 दरोडेखोरांनी प्रवेश करत झोपलेल्या महिला प्रवाशांच्या अंगावरील दागिने ओढण्यास सुरुवात केली. मोबाइल, पर्स आणि इतर साहित्य हिसकावले. प्रवाशांनी आरडाओरड सुरू केली. मात्र, संपूर्ण परिसर निर्मनुष्य असल्याने कोणासही कळाले नाही. गाडीतील सुमारे 6 ते 7 डब्यांमध्ये त्यांनी लुटमार केल्यानंतर दरोडेखोरांनी पळ काढला. रेल्वे चालकांनी सतर्कता दाखवत रेल्वे पुढे नेली मात्र, दरोडेखोरांनी साखळी ओढत गाडी थांबवली.

दौलताबाद, लासूर, औरंगाबाद शहरात अलर्ट

या घटनेच्या अर्ध्या तासानंतर रेल्वे मनमाडला रवाना झाली. याठिकाणी पोलिस चौकशीला सुरुवात झाली असून याबाबत दौलताबाद, लासूर, औरंगाबाद शहरात अलर्ट देण्यात आला असून या दरोडेखोरांचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.