कर्नाटकातील मंगळुरु येथे एक जुन्या मशिदीच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यावेळी या मशिदीच्या खाली चक्क हिंदू मंदिराचे अवशेष आढळून आले. त्यामुळे खळबळ माजली. म्हणून विश्व हिंदू परिषदेने तातडीने जिल्हा प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून जोपर्यंत यासंबंधी कागदपत्रांची पडताळणी होत नाही, तोवर बांधकाम थांबवण्यात यावे, अशी मागणी केली.
दुरुस्तीचे बांधकाम ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश
मंगळुरूच्या बाहेरील मलाली येथील जामा मशिदीचे नुतनीकरणाचे काम सुरू होते. तेव्हा हिंदू मंदिरासारखे वास्तूशिल्प आढळून आले. मशिदीच्या प्रशासनाकडून जेव्हा नुतनीकरणाचे काम सुरू होते. तेव्हा हे हिंदू मंदिराचे शिल्पे आढळून आली. यामुळे एके काळी या मशिदीच्या ठिकाणी एखादे हिंदू मंदिर असावे, असा दावा केला जाऊ लागला आहे. म्हणून विहिंपने सध्या येथे धाव घेतली. जिल्हा प्रशासनाकडून कागदोपत्री पडताळणी होईपर्यंत काम बंद ठेवण्याची मागणी केली आहे. दरम्यान दक्षिण कन्नड आयुक्तालयाने या घटनेची दखल घेत पुढील आदेश येईपर्यंत हे काम ‘जैसे थे’ स्थितीतच ठेवण्याचे सांगितले आहे.
वक्फ बोर्ड आणि न्याय विभागाची मदत घेणार
प्रशासनाकडून जमिनीच्या कागदपत्रांची पडताळणी आणि त्यांची तपासणी करण्यास येत आहे. तसेच लोकांनी शांतता राखावी, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे. दक्षिण कन्नडचे उपायुक्त राजेंद्र केवी यांनी म्हटले की, परिक्षेत्रातील अधिकारी आणि पोलिसांकडून आपणास यासंदर्भात माहिती मिळाली. जिल्हा प्रशासन जुने रेकॉर्ड आणि मालकी हक्काच्या विवरणाची माहिती घेत आहे. वक्फ बोर्ड आणि न्याय विभागाकडूनही मदत घेण्यात येईल, असे केवी यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community