GST ची ‘रेड’! भिंतीत लपवल्या १० कोटींच्या नोटा आणि १९ किलो चांदीच्या विटा!

143

ज्याप्रमाणे चित्रपटात घडते तसं काहीसं वास्तवात घडल्याची घटना मुंबईतील झवेरी बाजारातून समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेता अजय देवगणच्या रेड सिनेमाप्रमाणे रंगललेल्या शोध मोहिमेद्वारे झवेरी बाजारातील एका सराफाच्या कार्यालयातील भितींत घबाड दडवून ठेवलेले कोट्यावधींचे काळे धन जीएसटी विभागाच्या हाती लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जीएसटी विभागाने झवेरी बाजारातील चामुंडा बुलीयन या कंपनीवर केलेल्या कारवाईत कंपनीतील भिंतीतून तब्ब्ल १० कोटींची रोकड आणि १९ किलो चांदीच्या विटा ताब्यात घेतल्या आहेत. तर आयकर विभागानेही याप्रकरणी अधिक तपास सुरू केला असल्याचेही सांगितले जात आहे.

GST च्या हाती लागलं घबाड!

झवेरी बाजारातील चामुंडा बुलीयन या कंपनीची उलाढाल २०१९ -२० मध्ये २२.८३ कोटीवरून २०२०-२१ मध्ये ६६५ कोटी आणि २०२२ मध्ये तर १७६४ कोटी रुपयांपर्यंत वाढल्याचा संशय जीएसटी विभागाला आला अशी माहिती, जीएसटी विभागाने दिली.

(हेही वाचा – महाराष्ट्राच्या ‘या’ जिल्ह्यात दीड हजार पाणमांजरे आणि अडीचशे मगरी सापडल्या)

दरम्यान, गेल्या तीन वर्षांतील या उलाढालीमुळे जीएसटी विभागाने अधिक चौकशी सुरू केली. त्यानुसार, जीएसटी विभागाने कंपनीच्या कार्यालयांची झाडाझडती सुरू केली असता, कंपनीच्या एका ३५ चौरस मीटरच्या जागेत भिंतीत दडवलेली ९ कोटी ७८ लाखांची रोकड आणि १३ लाख रुपये किमतीच्या चांदीच्या विटा हाती लागल्या.

याबाबत अधिक तपास सुरू

ही कारवाई राज्य करविभागाचे सहआयुक्त राहुल द्विवेदी, उपायुक्त विनोद देसाई यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे. ही जागा सीलबंद करण्यात आली असून आयकर विभागालाही या घटनेची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, आयकर विभागाने ही रक्कम दागिने नेमके कुठून व कसे आले? याबाबत अधिक तपास सुरू केला आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.