ज्या व्यक्तीपासून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशा व्यक्तींना कलम १४९ ची नोटीस पोलिसांकडून पाठवली जाते. अशीच नोटीस मुंबई पोलिसांकडून राणा दाम्पत्यांना देण्यात आलेली आहे. मात्र राणा यांच्या मुंबईतील निवासस्थानी बेकायदेशीररित्या जमा झालेल्या शिवसैनिकावर कारवाई का करण्यात येत नाही, असा सवाल अनेकांकडून विचारला जात आहे.
‘त्या’ शिवसैनिकाना का रोखले जात नाही?
अमरावतीचे आमदार आणि खासदार असलेले राणा दाम्पत्यांना मातोश्री जवळ हनुमान चालिसा पठण करू, असे आव्हान केले होते. त्यानंतर राणा दाम्पत्य हे मुंबईत दाखल झाल्यानंतर शेकडो शिवसैनिक मातोश्रीवर गोळा झाले आहे. त्याचबरोबर शेकडो शिवसैनिक राणा दाम्पत्य यांच्या मुंबईतील खार येथील निवासस्थान या ठिकाणी गोळा झाले आहे. मुंबईतील कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्य यांना कलम १४९ अन्वये नोटीस शुक्रवारी दिली असून त्यांना मातोश्री जवळ येण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. मात्र राणा दाम्पत्य यांच्या निवासस्थानाच्या बाहेर गोळा झालेल्या शिवसैनिकाना का रोखले जात नाही, त्यांच्यापासून कायदा सुव्यवस्था बिघडत नाही का असा सवाल अनेकांकडून विचारला जात आहे.
(हेही वाचा – “…तो मला मारण्याचा कट होता”, शिवसैनिकांच्या हल्ल्यानंतर कंबोज यांची पोलिसांत तक्रार)
…म्हणून बजावली जाते १४९ ची नोटीस
शनिवारी राणा दाम्पत्य यांना घराबाहेर पडण्यास पोलिसांनी रोखले असता नवनीत राणा यांनी देखील फेसबुक लाईव्ह घेऊन शिवसैनिकांना का रोखले जात नाही, असा सवाल पोलिसांना विचारला आहे. ज्या व्यक्तीपासून कायदा सुव्यवस्था बिघडू शकतो म्हणून त्या व्यक्तीला प्रतिबंध घालण्यासाठी १४९ ची नोटीस दिली जाते, त्या व्यक्तीमुळे शेकडोच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरत असेल तर त्यांना रोखले जावू शकते, परंतु प्रत्येकाला नोटीस देण्यात येत नाही, असे एका अधिकाऱ्याने नाव न समोर आणण्याच्या अटीवर सांगितले.
Join Our WhatsApp Community