राणा दाम्पत्याने मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पठणाचा निर्णय मागे घेतला आहे. लता मंगेशकर पुरस्कार सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी मुंबईत येत असल्याने त्यांचा दौरा सुरळीत व्हावा यासाठी राणा दाम्पत्याने हा निर्णय घेतला आहे. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राणा दामपत्याची काळजी घेणं ही आपली जबाबदारी असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे जर आज अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री असते तर ही वेळ आली नसती, असं नवनीत राणा यांनी स्पष्ट केलं आहे.
(हेही वाचाः अखेर राणा दाम्पत्याची मातोश्रीवर जाण्यापासून माघार, काय आहे कारण?)
…तर ही परिस्थिती आली नसती
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या संपूर्ण घडामोडींवर लक्ष ठेऊन असल्याचं आम्हाला सांगण्यात आलं. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांना आता आणखी कुठलंच काम उरलेलं नाही. नवनीत राणा आणि रवी राणा यांना आमचे गुंड कधी मारतात याकडे त्यांचं लक्ष आहे. पण राणा दाम्पत्याची काळजी घेणं हे आमचं कर्तव्य आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. त्यामुळे त्यांच्या जागी जर अजित पवार असते तर इतकी वाईट परिस्थिती आज या महाराष्ट्रावर आली नसती, असं विधान नवनीत राणा यांनी केलं आहे.
जनता उत्तर देईल
शिवसैनिकांनी आमच्या घरावर हल्ला केला. कोणी दहशतवादी हनुमान चालिसा पठण करणार नव्हते तर राज्यावरील संकट दूर करण्यासाठी आम्ही हनुमान चालिसा पठण करणार होतो. ज्या नावाने तुम्ही आज मुख्यमंत्री झालात ती विचारधारा तुम्ही सोडली आहे, त्यामुळे हिंदुत्ववादी विचारांची जनता येत्या काळात तुम्हाला मतांच्या माध्यमातून उत्तर देईल. नवनीत राणा आणि रवी राणा घाबरणारे नाहीत जर घाबरणारे कोणी असतील तर ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत.
(हेही वाचाः राज्यात सरकारच्या भरवशावर हल्ले होत आहेत- फडणवीस)
Join Our WhatsApp Community