दगडफेक झाली हे खरं आहे… सोमय्यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर गृहमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

145

हनुमान चालिसा पठणावरुन गेले दोन दिवस राजकीय वातावरण तापले असतानाच, शनिवारी रात्री खार पोलीस स्टेशनबाहेर आणखी एक घटनी घडली. राणे दाम्पत्याला अटक केल्यानंतर त्यांना भेटायला गेलेल्या किरीट सोमय्यांवर दगडफेक करण्यात आली. यात किरीट सोमय्या जखमी देखील झाले. या सर्व प्रकारानंतर भाजपाकडून मुंबई पोलिसांवर टीका करण्यात येत आहे. अशातच आता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

पोलीस कारवाई करतील

दोन घटना काल घडल्या आहेत. गेले दोन दिवस सतत हनुमान चालिसाच्या नावाने गोंधळ घालण्यात आला आणि त्यानंतर पोलिसांनी योग्य ती कारवाई म्हणून त्यांना अटक केली आहे. शनिवारी रात्री जी घटना घडली त्याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार पोलीस आपली कारवाई करतील असे वळसे पाटील म्हणाले.

सगळ्यांनी सहकार्य करावे

 यासंदर्भात सगळ्यांनी समजुतीने घ्यावे, असे आवाहन वळसे पाटील यांनी केले आहे. दुर्दैवाने अशी घटना घडली आहे. पण यामध्ये सगळ्यांनीच समजुतीने सहकार्य करायला हवे. दगडफेक झाली हे खरं आहे. ती कोणाकडून झाली काय झाली, हा तपासाचा भाग आहे. त्याचा तपास करुन पोलीस योग्य ती कारवाई करतील, अशी प्रतिक्रिया गृहमंत्र्यांनी यावेळी दिली.

( हेही वाचा :पोलिसांच्या संरक्षणामध्ये ही गुंडशाही सुरु, भाजप जशास तसे उत्तर देणार; फडणवीसांचे मविआवर टीकास्त्र )

काय घडले शनिवारी रात्री 

सोमय्या हे राणा दाम्पत्यांची भेट घेऊन खार पोलीस स्थानकातून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या गाडीवर संतप्त शिवसैनिकांनी जोरदार हल्ला चढवला. त्यांच्या गाडीवर दगड, बाटल्या, चप्पला फेकण्यात आल्या. या हल्ल्यात सोमय्यांच्या गाडीच्या काचा फुटल्या व त्यांच्या चेह-याला दुखापत झाली. सोमय्या यांच्या हनुवटीला मार लागला, असून त्यातून रक्तस्त्राव होत होता. दरम्यान यानंतर सोमय्या यांनी वांद्रे पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.