खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मातोश्री बाहेर हनुमान चालिसा पठणाच्या चिथावणीखोर वक्तव्यानंतर, खार पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर कलम 153 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करुन, त्यांनी अटक करण्यात आली. सामाजिक तेढ निर्माण केल्याच्या आरोपावरुन अटक करण्यात आली. रविवारी राणा दाम्पत्याला न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी राणा दाम्पत्यांची 7 दिवसांची कोठडी मागितली होती. आता सुनावणी पूर्ण झाल्यावर, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याचा जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे. 124 (अ) अंतर्गत राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
राणा दाम्पत्याची पोलिसांत तक्रार
खासदार नववीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत तसेच परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह नाव माहिती नसलेल्या शिवसैनिकांविरोधात खार पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. ठाकरे आणि राऊत यांनी शिवसैनिकांना चिथवले असून आपल्या जिवला धोका असल्याचे म्हटले आहे. तसेच, शिवसैनिकांनी आंदोलनस्थळी रुग्णवाहिकी आणली होती, असेही राणा दाम्पत्याने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
मातोश्रीवर जाण्यापासून राणा दाम्पत्याची माघार
राणा दाम्पत्यांनी मातोश्रीसमोर जाऊन हनुमान चालिसा वाचण्याचे आव्हान केल्यानंतर शिवसैनिकांनी त्यांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. त्यामुळे राज्यात कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी मुंबई दौ-यावर येत असल्याने त्याला गालबोट लागू नये, म्हणून राणा दाम्पत्याने मातोश्रीवर जाण्यापासून माघार घेतली होती.
Join Our WhatsApp Community