मातोश्रीजवळ आल्यावर भाजप नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला. त्याविरोधात मोहित कंबोज यांनी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला. त्यानंतर मात्र पोलिसांना कुणाकडून फोन आल्यावर त्यांनी एफआयआरमधील सगळी कलमे रद्द केली, असा आरोप मोहित कंबोज यांनी केला.
तोवर आंदोलन करणारच!
सांताक्रूझ पोलिसांनी या एफआयआरमध्ये शिवसैनिकांच्या विरोधात मॉबलिंचिंग अर्थात खुनाचा प्रयत्न करणे अशा स्वरूपाचे कलमे लावण्यात आली होती. त्या एफआयआरवर आपली स्वाक्षरी घेण्यात आली आणि मला घरी जाण्यास सांगण्यात आले. तसेच एफआयआरची प्रत देण्यात येईल, असे सांगण्यात आले. त्यानंतर मात्र कुणाचा तरी फोन आला आणि एफआयआरमध्ये घातलेली सगळी कलमे रद्द करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी नवीन एफआयआर देण्यात येईल, असे सांगितले. मात्र आपण नवीन एफआयआर स्वीकारणार नाही, आपल्या मूळ एफआयआरमध्ये ज्यात मूळ कलमे घालण्यात आली, तिच एफआयआरची प्रत आपल्याला देण्यात यावी, अशी मागणी केली. जोवर तीच एफआयआरची बातमी मिळत नाही, तोवर आपण आंदोलन करणार, असेही कंबोज म्हणाले.
(हेही वाचा सोनिया गांधींच्या औषधोपचारासाठी एमएफ हुसेनचे पेंटिंग खरेदी करण्यास गांधी कुटुंबाने टाकलेला दबाव)
Join Our WhatsApp Community