शहर-ग्रामीणमधील तब्बल तीन हजार ५६१ जण मागील अडीच वर्षांत (२०२० ते मार्च २०२२ पर्यंत) त्यांच्या राहत्या घरातून पसार झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे त्यात दोन हजार ३४२ मुली व महिलांचा समावेश आहे. त्यातील ७८६ मुली व महिला आणि ६९४ तरूण व पुरूष अजूनपर्यंत सापडलेले नाहीत. दोन-अडीच वर्षांनंतरही बेपत्ता असलेल्या महिला, मुली, तरूणांचे पुढे काय झाले, याचा शोध लागणे खूप गरजेचे आहे.
आकडेवारीतून धक्कादायक वास्तव समोर
बालविवाहाची संख्या वाढत असतानाच, घरातून अल्पवयीन आणि १८ वर्षांवरील मुली, तरूण, महिला, पुरुष बेपत्ता होण्याचे प्रकारही वाढल्याचे वास्तव पोलिसांकडील आकडेवारीतून समोर आले आहे. कोरोना काळात हातावरील पोट असलेल्या कुटुंबातील पालक मिळेल त्या ठिकाणी काम करीत होते. मोबाईल, टीव्हीमुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होते म्हणून मुलांना त्यांनी आतापर्यंत चार हात लांबच ठेवले होते. पण, कोरोना काळात शाळा बंद राहिल्याने ऑनलाईन शिक्षणासाठी त्या पालकांना आपल्या मुलांसाठी नवीन मोबाईल घेऊन द्यावे लागले. अनेकांनी त्याचा अभ्यासासाठी वापर केला, तर काहींनी त्याचा गैरफायदाही उठवला. काही तरूण-तरूणी, अल्पवयीन मुली घरातील कोणालाच काहीही न सांगता पळून गेले.
( हेही वाचा: जुनी मुंबई कशी होती? बॉम्बे ते मुंबई असा उत्कंठावर्धक प्रवास आमच्या मुंबईचा…)
Join Our WhatsApp Community