महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील मशिदींवरील भोंगे ३ मे पर्यंत खाली उतरावा अन्यथा दुप्पट लाऊड स्पीकर लावून त्यावरून हनुमान चालीसा लावण्यात येईल, असा अल्टिमेटम दिला. त्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याविषयावर सर्व पक्षीय बैठकीचे आयोजन केले. त्या बैठकीनंतरही मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मनसेचा ३ मे हा अल्टिमेटम कायम आहे, असे सांगत आम्ही हनुमान चालीसा लावणारच, असा इशारा दिला.
अन्य धर्मियांप्रमाणे हिंदूंना परवानगी द्यावी
या बैठकीनंतर बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भोंग्यासंदर्भात राज्य सरकार काही निर्णय घेऊ शकत नाही असे स्पष्ट केले. या बैठकीनंतर मनसेने भोंग्यांच्या जी भूमिका घेतली आहे, ती कायम असणार आहे. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहे. कायदा आणि सुव्यवस्था उत्तम राखायची आहे. राज ठाकरे यांनी जेव्हा भूमिका मांडली तेव्हा सर्वोच्च न्यायालयाचा दाखल दिला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे अन्य धर्मियांना परवानगी मिळत आहे, तशी परवानगी द्यावी, असे बाळा नांदगावकर म्हणाले.
(हेही वाचा महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात एकत्र राष्ट्रपती राजवट लावा, असे का म्हणाले संजय राऊत?
सर्वपक्षीय बैठकीत केंद्रावर जबाबदारी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील मशिदींवरील भोंगे खाली उतरवण्यासाठी ३ मे हा दिवस अल्टिमेटम दिला होता. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतली. त्यावेळी भोंग्यांसंबंधी धोरण ठरवण्याचा निर्णय केंद्राने घ्यायचा आहे, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारची आहे. त्याचा भंग झाला तर आवश्यक ती कारवाई पोलिसांनी करणे आवश्यक आहे, अशी मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली.
Join Our WhatsApp Community