दक्षिण-पूर्व महाराष्ट्रातील महत्त्वाचा जिल्हा असलेल्या सोलापूरच्या समन्वित विकासासाठी सोमवारी सोलापूर येथे 8,181 कोटी रुपये किंमतीच्या आणि 292 किमी लांबीच्या 10 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उद्घाटन केले त्यावेळी ते बोलत होते. खासदार रणजित नाईक निंबाळकर, डॉ. श्रीजयसिद्धेश्वर महास्वामी , रमेश जिगाजिनगी, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे तसेच जिल्ह्यातील इतर आमदार आणि अधिकारी यावेळी उपस्थित होते.
सात वर्षात 1,771 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे पूर्ण
सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर 37 हजार 25 कोटी रुपये खर्चाची 32 कामे मंजूर करण्यात आली, त्यापैकी 12 पूर्ण झाली आहेत तर 9 प्रगतीपथावर आहेत असे गडकरी यांनी सांगितले. आणखी 20 हजार 400 कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहेत, सोलापूर जिल्ह्यात गेल्या सात वर्षात एक हजार 771 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे झाली असून ही वाढ 173 % असून महाराष्ट्रात रस्ते बांधणीचे सर्वाधिक काम सोलापुरात झाल्याचे ते म्हणाले.
(हेही वाचा – शरद पवार म्हणाले, “… त्याकरिता इतकं अस्वस्थ व्हायची गरज नाही” )
वाहतूककोंडी कमी होणार
सुरत-चेन्नई ग्रीन एक्स्प्रेस महामार्गाचे काम सुरु असून यामुळे सुरतहून मुंबई-पुण्यमार्गे होणारी वाहतूक नाशिक-नगर-सोलापूर मार्गे थेट येईल. यामुळे वाहतूककोंडी कमी होईल. तसेच वेळ वाचेल. मुंबई-पुणे-बंगलोर मार्गाचे काम लवकरच हाती घेतले जाईल असे ते म्हणाले. या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी 17 हजार 200 कोटी रुपये दिल्याची माहिती त्यांनी दिली.जिल्ह्यातील साखर कारखान्यांना जास्तीत जास्त इथेनॉल तयार करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच ग्रीन हायड्रोजन हे आपलं भविष्य असून यात अधिक संशोधनाची गरज त्यांनी व्यक्त केली.
Join Our WhatsApp Community