धुळ्यातील एका बँकेतील बँक मॅनेजरने जिथे काम करतो त्या ठिकाणीच डल्ला मारल्याचे समोर आले आहे. मॅनेजरने हे कृत्य केल्याने तक्रारदार महिलेचा पती व बँकेच्या तत्कालीन मॅनेजरसह अन्य एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
काय आहे प्रकरण
धुळे शहरातील गल्ली क्रमांक पाचमध्ये असलेल्या कॅनरा बँकेत खातेदाराची बनावट सही व अंगठा टेकवत सुमारे १९ लाख ५७ हजार रुपये परस्पर बँक खात्यातून काढले. याप्रकरणी तक्रारदार महिलेचा पती व बँकेच्या तत्कालीन मॅनेजरसह अन्य एकाविरुद्ध आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
(हेही वाचा – गणपतीपुळ्यात पहिल्यांदा आढळली ऑलिव्ह रिडले कासवाची पिल्ले)
यासिरबानो मोहंमद अकबर अन्सारी (वय ३९ ) यांनी तक्रार दिली आहे. घर विक्रीचे पैसे कॅनरा बँकेत ठेवले जाते. हे खाते तक्रारदार यासिरबानो व त्यांच्या आईच्या नावावर आहे. यासिरबानो यांच्या परोक्ष पती मोहंमद अकबर मकबुल अन्सारी (रा. मिल्लतनगर, अबकर मशिदीजवळ), बँकेचे तत्कालीन शाखाधिकार्यांनी ही रक्कम काढली. त्यासाठी सही व त्यांच्या आईच्या नावाने बनावट अंगठे दिले. हा प्रकार १७ नोव्हेंबर २०११ ते १० जुलै २०१४ यादरम्यान झाला होता.
Join Our WhatsApp Community