गेल्या काही दिवसांपासून हनुमान चालिसा पठणावरुन राज्यातील वातावरणात राजकीय वादळ उसळलं आहे. राणा दाम्पत्यावर केलेल्या कारवाईनंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. त्याला आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मला लवकरच सभा घेऊन सगळ्यांचा सोक्षमोक्ष लावायचा आहे.
बिनकामाच्या भोंग्यांना मी काडीची किंमत देत नाही, असं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानातून त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अप्रत्यक्ष टोला लगावल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात होत आहे. बेस्टच्या चलो कार्डच्या लोकार्पण समारंभात मुख्यमंत्री बोलत होते.
त्यांना मी काडीची किंमत देत नाही
लवकरच माझा जाहीर सभा घेण्याचा मानस आहे. आणि तिथे मला मास्क काढून बोलायचंय. सगळ्यांचा मला सोक्षमोक्ष लावायचा आहे. हे तकलादू हिंदुत्ववादी आले आहेत त्यांचा समाचार मला घ्यायचा आहे. हा कार्यक्रम राजकीय नाही, पण तरीही जे बिनकामाचे भोंगे वाजत आहेत त्यांना मी काडीची किंमत देत नाही, असं देखील मुख्यमंत्री म्हणाले.
(हेही वाचाः नवनीत राणांच्या पत्रानंतर लोकसभा सचिवालयाचे राज्य सरकारला निर्देश)
दादगिरी मोडायला बाळासाहेबांनी शिकवलंय
आमचं हिंदुत्व हे गदाधारी आहे. रामदास स्वामींनी लिहून ठेवलेल्या मारुती स्त्रोतातील भीमरुप आणि महारुद्र काय असतं ते शिवसेनेच्या अंगावर आल्यावर आम्ही दाखवायला कमी करणार नाही. हनुमान चालिसा जर आमच्या घरी येऊन म्हणायची असेल तर म्हणू शकतात, पण त्याला एक पद्धत असते. आमच्या घरी दिवाळी असो नसो साधुसंत येत असतात. पण तुम्ही जर दादागिरी करुन याल, तर ती कशी मोडायची हे देखील शिवसेना प्रमुखांनी आम्हाला हिंदुत्वाच्या भाषेत शिकवलं आहे.
(हेही वाचाः ‘जय श्रीराम’नंतर आता ‘जय हनुमान, मोदी सरकारच्या अष्टपूर्तीचा ‘हा’ आहे प्लान)
Join Our WhatsApp Community