अमरावती मेडिकल कॉलेजचा मार्ग मोकळा

146

अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेडिकल) स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी नांदगाव पेठ येथील १८.५३ हेक्टर जागेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय उभारण्याचा सूचना केल्या आहेत. कॉलेज उभारण्यासाठी चार सदस्यीय समितीही स्थापन केली आहे.

( हेही वाचा : देशात इलेक्ट्रिक हायवे निर्माण करणार! )

मेडिकल कॉलेजचा मार्ग मोकळा

अमरावती येथे मेडिकल कॉलेज स्थापन करण्याची मागणी २०१७ पासूनची आहे. २०१९ मध्ये वैद्यकीय शिक्षण संशोधन व संचालनालयाने (डीएमईआर) समिती स्थापन केली. दरम्यानच्या काळात जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी मेडिकल कॉलेजबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व वैद्यकीय शिक्षणमंत्री देशमुख यांच्याशी चर्चा केली. परिणामी, जानेवारी, २०२१ रोजी हा विषय कॅबिनेटपुढे येऊन सकारात्मक चर्चा झाली. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही अमरावती मेडिकल कॉलेजसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली. आता जागेचाही प्रश्न सुटल्याने मेडिकल कॉलेजचा मार्ग मोकळा झाल्याचे चित्र आहे. अमरावती येथील ‘नांदगाव पेठ’ भाग-२ मधील गट क्र. ३८१मधील २ हेक्टर, गट क्र. ३८२ मधील १३.५३ हेक्टर, गट क्र. ३८३ मधील १३.८८ हेक्टर तर गट क्र. ३८२ला लागून असलेली ३ हेक्टर अशी एकूण १८.५३ हेक्टर शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अमरावती मेडिकल कॉलेजच्या स्थापनेसाठी समन्वय अधिकारी व तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आली. यात अध्यक्ष म्हणून नागपूरच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. संजय पराते, सदस्य म्हणून नागपूर मेडिकलच्या शरीररचनाशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. तारकेश्वर गोडघाटे, नागपूर मेडिकलच्या औषधवैद्यकशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. व्ही.आय. खंडाईत व नोडल अधिकारी डॉ. विजय शेगोकार आहेत, तर प्रशासकीय कामकाजात मदत करण्यासाठी नागपूर मेडिकलचे प्रशासकीय अधिकारी संजीव देशमुख यांची नेमणूक करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.