स्काऊट गाईड राज्य पुरस्कार सोहळा: अर्ध्या तासानंतर राज्यपालांच्या कार्यक्रमातील वीजपुरवठा पूर्ववत

150

मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्क परिसरातील स्काऊट गाईड हॉलमध्ये मंगळवारी ‘स्काऊट गाईड राज्य पुरस्कार सोहळ्याचे’ आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हजेरी लावणार होते. मात्र, हा कार्यक्रम सुरू होण्याआधीच येथील बत्ती गुल झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, सद्यस्थितीत वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर स्काऊट गाईड हॉलमध्ये कार्यक्रमाला सुरूवात झाली.

(हेही वाचा – मुंबई-नवीमुंबई, ठाण्यासह डोंबिवली, अंबरनाथमध्येही बत्ती गुल! काय आहे कारण?)

गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे स्काऊड गाईडचा हा पुरस्कार सोहळा झाला नव्हता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम झाला नसल्याने आता तब्बल दोन वर्षानंतर स्काऊट गाईड राज्य पुरस्कार सोहळ्याचे मंगळवारी आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत हा कर्यक्रम पार पडणार असल्याने प्रशासनाने तातडीने वीज पुरवठा सुरळीत केला.

अर्धा ते पाऊण तास वीजपुरवठा खंडीत

मुंबईसह दादर परिसरात मंगळवारी सकाळी 10:15 वाजल्यापासून वीज पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे शिवाजी परिसरातील ही वीजपुरवठा खंडीत झाला होता. जवळपास अर्धा ते पाऊण तास वीजपुरवठा खंडीत झाला होता. दरम्यान, या कार्यक्रमाला राज्यपाल उपस्थित राहणार असल्याने प्रशासनाने तातडीने तांत्रिक अडचणी दूर करत वीजपुरवठा सुरळीत केला असल्याचे सांगितले जात आहे.

स्काऊट गाईड राज्य पुरस्कार व प्रमाणपत्र वितरण सोहळा

दादरमधील स्काऊट गाईड हॉलमध्ये मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास स्काऊट गाईड राज्य पुरस्कार व प्रमाणपत्र वितरण सोहळा पार पडणार होता. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार आहेत. त्याशिवाय, खनिकर्म, क्रीडा व युवक कल्याण, माहिती व जनसंपर्क विभागाच्या राज्यमंत्री अदिती तटकरे उपस्थित राहणार होते. हा कार्यक्रम सुरू होण्याआधीच वीज पुरवठा खंडित झाल्याने सर्वांची धांधल उडाल्याचे पाहायला मिळाले.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.