काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या मनी हाइस्ट या बॅंक चोरीच्या घटनेवर आधारलेल्या वेबसीरीजला लाजवेल असा धक्कादायक प्रकार महाराष्ट्रात घडला आहे. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात चक्क जेसीबीने एटीएम मशिन फोडत चोरी करण्यात आली.
( हेही वाचा : आता बेस्टमध्येही करता येणार रिझर्व्हेशन )
सीसीटीव्ही फुटेज सध्या ट्विवरवर व्हायरल
सांगली तालुक्यात मिरजमध्ये आरग येथे जेसीबी एटीएममध्ये घुसवत एटीएम मशिन फोडून चोरी केल्याची घटना समोर आली आहे. चोरीचा हा अजब प्रकार पाहून पोलिसांनी सुद्धा आश्चर्य व्यक्त केले आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सध्या ट्विवरवर प्रचंड व्हायरल होत असून यात एक व्यक्ती एटीएमच्या जातो. त्यानंतर तो व्यक्ती बाहेर आल्यावर जेसीबीने थेट एटीएम मशिन फोडले जात असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. एक्सिस बॅंकेच्या एटीएममध्ये २७ लाखांची रोख रक्कम होती. पण चोरटे ही रक्कम न घेताच पसार झाले. यासंदर्भात माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
#ViralVideo | चक्क जेसीबीच्या साहाय्यानं एटीएम चोरी, घटना CCTV मध्ये कैद, सांगलीतील घटना #Maharashtranews #Crime #JCB #Sangli #latestnews pic.twitter.com/tXKCEcT4Mu
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) April 26, 2022
ज्या जेसीबीने हा एटीएम फोडला तो जेसीबी सुद्धा चोरीचा होता. एटीएम फोडल्यावर या मशिनचे तीन तुकडे झाले. परिस्थितीचा अंदाज घेऊन चोरांनी तेथून पळ काढत चोरीची रक्कम सुद्धा न घेताच चोर पसार झाले.
Join Our WhatsApp Community