युगपुरुष स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या चरित्राचे तसेच त्यांच्या विचारांचे परिशीलन व्हावे, त्यातून प्रेरणा मिळून राष्ट्रकार्याची सिद्धता व्हावी यासाठी स्वातंत्र्यवीरांचे व त्यांच्या विषयीचे साहित्य अभ्यासले जाणे अगत्याचे आहे. अशा अभ्यासकांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा केंद्राच्या (विलेपार्ले) वतीने एका खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेविषयी माहिती खालील प्रमाणे
निबंधासाठी विषय – स्पर्धकाने पुढे दिलेल्या तीन विषयांपैकी एका विषयाची निवड करावी.
१. स्वातंत्र्यवीरांचा वारसा
२. स्वातंत्र्यवीरांच्या जीवनातील दोन प्रेरणादायी प्रसंग
३. राष्ट्रद्रष्टे सावरकर
स्पर्धेचे नियम आणि तपशील
शब्दमर्यादा
किमान १००० शब्द, कमाल १२०० शब्द, निबंध कागदाच्या एकाच बाजूला सुवाच्च लिहिलेला /टंकलिखित असावा. निबंध टपालाने किंवा इ मेलने पाठवावा. हस्तलिखित निबंधाचे प्रकाशचित्र पीडीएफ् पद्धतीने पाठविण्याची मुभा आहे. निबंध दि. १ जून २०२२ पर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.
टपालासाठी पत्ता
सावरकर समाज कल्याण मंदिर (सावरकर केंद्र), म. गांधी मार्ग, विलेपार्ले पूर्व, मुंबई ४०००५७
इ मेल –
निबंधातील उद्धृतांविषयी स्पष्ट श्रेयनिर्देश करावा, परीक्षणासाठी स्पर्धकाने केलेले आपल्या मुद्यांचे समर्थन महत्त्वाचे असेल.
पारितषिके –
(रोख) प्रथम रु. ३०००, द्वितीय रु. २५०० व तृतीय रु.२०००. अपेक्षित किमान गुणवत्तेचे निबंध प्राप्त न झाल्यास पारितोषिके देणे आयोजकांवर बंधनकारक असणार नाही. परीक्षकांच्या शिफारशीनुसार उत्तेजनार्थ पारितोषिके दिली जातील.
स्पर्धेत प्राप्त झालेल्या निबंधांचे सर्व हक्क आयोजकांच्या स्वाधीन असतील. परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक असेल. स्पर्धेच्या नियमांत बदल करण्याचा आयोजकांना अधिकार राहील. स्पर्धकाने आपले पूर्ण नाव, जन्मतारीख, टपाल पत्ता, इ मेल, भ्रमणध्वनी क्रमांक स्वतंत्र कागदावर लिहून निबंधाला जोडावा/ स्वतंत्र पृष्ठ म्हणून इ मेलमध्ये द्यावा. स्पर्धकाने आपला भाग घेण्याचा मानस वरील माहितीसह ७७३८२२८२६० या क्रमांकावर दि. १५ मे पर्यंत विदित करावा. स्पर्धेत विनाशुल्क सहभाग घेता येणार असून १८ वर्षांवरील सर्वांना खुली आहे.
Join Our WhatsApp Community