सोपं नसतं भाऊ, लोकल चालवताना मोटरमन-गार्डना काय काय करावं लागतं, एकदा वाचाच

169

दिवस-रात्र लाखो प्रवाशांना त्यांच्या इच्छित ठिकाणी सुखरुप पोहोचवण्याचं काम मोटरमन-गार्ड करत असतात. ते जर नसतील तर आपली लाईफलाईन धावणं केवळ अशक्य आहे. ते केवळ मुंबईची लाईफलाईन चालवत नाहीत, तर असंख्य लोकांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या लाईफची काळजी वाहतात.

(हेही वाचाः भारतातल्या पहिल्या रेल्वेतून प्रवास करणारा पहिला भारतीय कोण? माहीत आहे का?)

लोकलला काही मिनिटं उशीर झाला तर आपण पुढचा-मागचा कसलाही विचार न करता थेट मोटरमनला शिव्यांची लाखोली वाहून मोकळे होतो. पण लोकल चालवताना मोटरमन आणि गार्डना काय काय सहन करावं लागतं याची लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना साधी कल्पनाही नसते. असंख्य शारीरिक आणि मानसिक कष्ट त्यांना सोसावे लागतात. ते कष्ट जाणून घेतल्यावर, आपला प्रवास सुखकर करण्यासाठी त्यांना किती खडतर प्रवास करावा लागतो हे आपल्या लक्षात येईल.

(हेही वाचाः ‘या’ चुका झाल्या नसत्या तर सचिनच्या नावावर 102 सेंच्युरी असत्या)

18 तासांपेक्षा जास्त सलग सुट्टी नाही

आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवण्यासाठी आपल्यापैकी अनेकांना आठवड्यातला संपूर्ण एक दिवस मिळतो. पण मोटरमन आणि गार्डना एक दिवस सोडा, सलग अठरा तासांपेक्षाही जास्त वेळ मिळत नाही. सर्वसामान्यांना सणावाराला किंवा ज्या हक्काच्या सुट्ट्या वर्षातून घेता येतात, त्यादेखील मोटरमन गार्डना कधी कधी मिळत नाहीत. पण तरीही प्रामाणिकपणे सेवा देत ते आपलं कर्तव्य पार पाडत असतात.

(हेही वाचाः युद्धातही देशाच्या मदतीला धावून आली होती ‘एसटी’ )

आपत्कालीन परिस्थितीचा करावा लागतो सामना

दंगल, आंदोलन अशा परिस्थितीत देखील मोटरमन आणि गार्डवर मोठी जबाबदारी असते. आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आंदोलक मोटरमन आणि गार्डच्या केबिनवर काही वेळा दगडफेक करतात. अशावेळीही मोटरमन, गार्डना आपल्या लोकलचा ताबा सोडता येत नाही. तसेच या काळात त्यांना अनेक दिवस सलग काम करावे लागते.

(हेही वाचाः पाऊस पडला म्हणून सचिन ‘ती’ मॅच खेळू शकला आणि त्याने पाकिस्तानच्या ‘या’ खेळाडूला ‘धू-धू धुतला’)

एखादा अपघात झाल्यानंतर ट्रॅकवरील मृतदेह बाहेर काढण्याची प्राथमिक जबाबदारी ही त्यांचीच असते. अशावेळी लोकलचा खोळंबा होतो. पण एका अपघातामुळे पुढे येणारी मोठी दुर्घटना टाळण्यासाठी त्यांना अपघातानंतर लोकलमधील सर्व यंत्रणा योग्य असल्याची खात्री करावी लागते आणि मगच पुढे मार्गक्रमण करावे लागते.

mumbai

लोकल सुरू करण्यापूर्वी कराव्या लागतात ‘या’ गोष्टी

  • लोकल ट्रेनचं सारथ्य करण्यापूर्वी मोटरमन-गार्ड कुठल्याही नशेत नाहीत ना, हे तपासण्यासाठी रोज त्यांची ब्रिदलायझर टेस्ट करावी लागते. ब्रिदलायझर मशिनच्या सहाय्याने ही टेस्ट करण्यात येते.
  • त्यानंतर मोटरमन-गार्डना आपलं घड्याळ रेल्वेच्या घड्याळाप्रमाणं सेट करावं लागतं.
  • लोकलमधून प्रवास करताना आपलं लक्ष मोबाईलच्या स्क्रीनवरुन एका मिनिटासाठीही हटत नाही. पण मोटरमन-गार्डना मात्र प्रवास सुरू करण्यापूर्वी आपले मोबाईल फोन बंद करुन ठेवावे लागतात.

(हेही वाचाः तुम्ही तर ‘गधाधारी’, फडणवीसांचा ठाकरेंना टोला)

  • गार्ड आणि मोटरमन यांचा संपर्क राहण्यासाठी केबिनमधील टॉक बॅक यंत्रणा नीट काम करत आहे की नाही, हे दोघांना तपासावे लागते.
  • लोकलचे ब्रेक सुस्थितीत आहेत की नाही याची देखील मोटरमनना तपासणी करावी लागते.
  • लोकलच्या अंतिम स्थानकाचे एलईडी फलक गार्डना बदलावे लागतात.

आपला प्रवास सुखरूप करण्यासाठी इतकं मोठं दिव्य करणाऱ्या मोटरमन-गार्डना एक सॅल्युट तर बनतोच ना मित्रांनो…

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.