मातोश्रीसमोर हनुमान चालीसा म्हणण्यासाठी आंदोलन करणाऱ्या राणा दाम्पत्याना अटक केल्यानंतर एक दिवस पोलीस कोठडीत काढल्यावर नवनीत राणा यांनी त्यांना त्या मागासवर्गीय असल्यामुळे त्यांना पोलिसांनी पाणी दिले नाही, तसेच बाथरुमही वापरायला परवानगी दिली नाही, अत्यंत खालच्या दर्जाच्या भाषेत मला शिवीगाळ केली गेली, असा गंभीर आरोप केला. तसे लेखी पत्र थेट लोकसभा अध्यक्षांना लिहिले. मात्र त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी पोलीस ठाण्यातील व्हिडीओ व्हायरल केला, त्यात राणा दाम्पत्याचा पोलीस चांगला पाहुणचार करत असतानाचे दिसत आहे.
काय म्हटले पोलीस आयुक्त?
या व्हिडीओत मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ट्वीट केला असून यामध्ये खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा पोलीस ठाण्यात बसून चहा पित असल्याचे दिसत आहे. नवनीत राणा यांनी एकीकडे पोलिसांनी पाणीदेखील दिले नसल्याचा आरोप केला असताना संजय पांडे यांनी या व्हिडीओतून त्यांचे सर्व आरोप खोडून काढले आहेत. संजय पांडे यांनी व्हिडीओ ट्वीट करताना आम्हाला अजून काही बोलायची गरज आहे का? अशी विचारणा केली आहे.
(हेही वाचा “मी धर्मांध नाही धर्माभिमानी आहे”…मनसेचा नवा टिझर पाहिलात का?)
काय म्हणाल्या नवनीत राणा?
मी केवळ मुख्यमंत्र्यांच्या घऱाबाहेर हनुमान चालिसा म्हणायची परवानगी मागितली होती. आणि मी तेवढेच करणार होते. कोणत्याही धार्मिक भावना भडकावण्याचा माझा हेतू नव्हता. मी मुख्यमंत्र्यांना म्हटले होते की, तुम्हीही या. मात्र यामुळे कदाचित कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून मी सांगितले की मातोश्रीवर जाणार नाही. त्याऐवजी माझ्या खारमधील राहत्या घरीच हनुमान चालिसा म्हणणार आहे, अशी माहिती नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात दिली आहे.
Join Our WhatsApp Community