सायन येथील पालिका रुग्णालयात दोन नवी शस्त्रक्रिया गृहे सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णसेवेचा दर्जा उंचावण्यास मदत होईल, असा विश्वास रुग्णालय प्रशासनाने व्यक्त केला. या दोन शस्त्रक्रिया विभागाचे आणि सभागृहाचे उदघाट्न पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी केले.
लठ्ठपणा विषयक व्यवस्थापनाची माहिती
लोकमान्य टिळक रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाचा ७५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने या विभागांचे उद्धाटन करण्यात आले. यापैकी एक शस्त्रक्रिया गृह हे अवयव प्रत्यारोपणासाठी; तर दुसरे शस्त्रक्रियागृह पोटाच्या विकारांंशी संबंधित शस्त्रक्रिया करण्यासाठी उपयोगात येणार आहे. सुप्रसिद्ध ओबेसिटी सर्जन डॉक्टर संजय बोरुडे यांनी लठ्ठपणा विषयक व्यवस्थापन आणि बॅरिॲट्रिक सर्जरी याबाबत माहिती दिली.
डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांनी बदलत्या जीवनशैलीमध्ये आहाराचे महत्त्व आणि मधुमेहासारख्या आजारावर मात करण्यासाठी आहारात, आहाराच्या प्रमाणात आणि आहाराच्या वेळेत कोणते बदल करावेत याबाबत माहिती दिली.
Join Our WhatsApp Community