टेस्लाचे सीईओ एलाॅन मस्क यांनी ट्वीटर कंपनी विकत घेतली आहे. 44 अब्ज डाॅलरमध्ये हा करार करण्यात आला. मस्क यांनी प्रति शेअर 54.20 डाॅलर या दराने ट्विटर विकत घेण्याची ऑफर दिली होती. ट्विटर एलाॅन मस्क यांच्या मालकीचे झाल्यानंतर आता ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांचे पद धोक्यात येणार की काय याची चर्चा रंगली आहे.
अग्रवाल यांचे सीईओ पद धोक्यात
पराग अग्रवाल हे ट्विटरचे सीईओ आहेत आणि जर त्यांना पदावरुन हटवले गेले, तर ट्विटरला मोठी किंमत मोजावी लागणार आहे. 4.2 कोटी डाॅलर्स अर्थात 3.2 अब्ज रुपये मोजावे लागणार आहेत. नोव्हेंबर 2021मध्ये पराग अग्रवाल यांनी जॅक डाॅर्सी यांच्याकडून ट्विटरचे सीईओ पद हाती घेतले होते. एलाॅन मस्क यांचे ट्विटरशी डील झाल्यानंतर, पराग अग्रवाल यांनी ट्वीट करत, ट्विटरचे भविष्य अनिश्चित असल्याचे म्हटले होते. दरम्यान, मस्क यांची ट्विटर खरेदी करण्याची डील टेस्लाच्या गुंतवणूकदारांना फारशी रुचली नसल्याचे दिसून येत आहे. कारण टेस्लाचे 9 टक्क्यांपेक्षा अधिक शेअर गडगडले आहेत.
( हेही वाचा: धक्कादायक! विजेच्या धक्क्याने लहान मुलांसह 11 जणांचा मृत्यू )
एलाॅन मस्क यांचे ट्वीट
ट्विटरच्या बोर्डाने सोमवारी रात्री ही ऑफर स्वीकारली आहे. ट्वीटरवरुन माहिती देताना, टेस्लाचे सीईओ एलाॅन मस्क यांनी अखेर ट्वीटर विकत घेतल्याची पुष्टी केली आहे. दरम्यान, टेस्लाचे एलाॅन मस्क यांचे आणखी एक ट्वीट व्हायरल होत आहे, त्यानुसार मस्क ट्वीटर खरेदीचा अंतिम करार होण्याची शक्यता असल्याचे समजत होते. मला आशा आहे की माझ्या वाईट टीका अजूनही ट्वीटरवर राहतील, कारण माझ्या मते यालाच खरे बोलण्याचे स्वांतत्र्य म्हणतात, असे मस्क यांनी ट्वीट करत म्हटले आहे.
https://twitter.com/elonmusk/status/1518677066325053441?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1518677066325053441%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.marathi.hindusthanpost.com%2Fspecial%2Felon-musk-and-twitter-deal-finally-musk-became-new-owner-of-twitter%2F64529%2F
Join Our WhatsApp Community