भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर मुंबईत हल्ला करण्यात आला. पोलिसांच्या मदतीने माझ्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा दावा सोमय्यांनी केला असून त्यांनी दिल्लीत थेट धाव घेतली आहे. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहसचिवांकडे घटनेची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, किरीट सोमय्या यांनी राणांना भेटायला जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांच्या गाडीवर संतप्त शिवसैनिकांनी हल्ला चढवला. यावेळी सोमय्यांच्या गाडीवर दगड भिरकावण्यात आला. यामध्ये ते जखमी झाले. सोमय्यांना झालेली दुखापतीसंदर्भात भाभा रुग्णालयातील वैद्यकीय अहवाल सादर केला आहे.
(हेही वाचा – मनसे सज्ज! औरंगाबाद सभेपूर्वीच पुण्याहून मागवले ५० हून अधिक भोंगे)
भाभा हॉस्पिटलकडून मुंबई पोलिसांना अहवाल सादर
सोमय्या यांच्या गाडीवर संतप्त शिवसैनिकांनी हल्ला चढवल्यानंतर त्यांनी रुग्णालयात जाण्याऐवजी तेथेच गाडीत ठिय्या देण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांच्या हनुवटी जवळून रक्त येत होते. या जखमेची मोठी चर्चाही माध्यमांमधून झाली. अखेर रुग्णालयाचा अहवाल समोर आला आहे. किरीट सोमय्या यांची तपासणी केल्यानंतर भाभा हॉस्पिटलने मुंबई पोलिसांना अहवाल सादर केला आहे. सोमय्यांवर शिवसैनिकांनी खार पोलीस ठाणे परिसरात हल्ला केला होता. त्यानंतर पोलिसांनी सोमय्यांची तक्रार नोंदवून घेतली. यावेळी करण्यात आलेल्या वैद्यकीय चाचणीत महत्वाची माहिती समोर आली आहे.
- सोमय्या याची जखम 0.1 सेमीचा कट आहे
- कोणतीही सूज नाही
- रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात नाही
- कोणतीही मोठी दुखापत झाली नाही
राऊतांचा सोमय्यांवर निशाणा
सोमय्यांचा वैद्यकीय अहवाल समोर आल्यानंतर आता राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सोमय्यांवर निशाणा साधला जाण्याची शक्यता आहे. अशातच शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोमय्या यांच्यावर निशाणा साधत ते चेहऱ्याला टोमॅटो सॉस लावून फिरत असल्याची टीका केली होती.
Join Our WhatsApp Community