… तर सोमय्यांची हत्या झाली असती, दरेकरांचा गंभीर आरोप

192

भाजपचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने बुधवारी राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. सोमय्या यांच्यावर 60 ते 70 जणांच्या जमावाने हल्ला केला. या हल्ल्यात सीआयएसएसचे जवान होते, म्हणून सोमय्यांचा जीव वाचला, नाही तर सोमय्यांची हत्या झाली असती, असा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी नेते प्रविण दरेकर यांनी केला आहे.

काय म्हणाले प्रविण दरेकर?

आम्ही गृहमंत्री, गृहसचिवांकडे गेलो असतो. पण ते न्याय देतील असे वाटले नाही. सरकार सुडाने पेटलेले आहे. सोमय्या भ्रष्टाचार काढत आहेत. म्हणूनच त्यांना गायब करण्याचा डावा होता. राज्यपालांकडे आमची शेवटची आशा आहे. म्हणून त्यांच्याकडे न्याय मागायला आलो. आमचा कायद्यावर विश्वास आहे. कायद्याने झाले नाही तर आम्ही संघर्ष करू. या संपूर्ण प्रकरणाचा राज्य सरकारकडून तात्काळ अहवाल मागावा, अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे केल्याची माहिती प्रविण दरेकरांनी दिली.

दरेकरांचा संतप्त सवाल

भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतल्यानतंर राजभवनातून बाहेर पडताच प्रवीण दरेकर आणि किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. सोमय्यांवर हल्ला होत असताना पोलीस आणि सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत होते. या सर्व गोष्टी पोलीस आयुक्तांच्या आदेशावर चालल्या होत्या. तसे वातावरण सोमय्यांनी पाहिले. दबावाखाली अॅक्टिव्हिटी होत होत्या. या गोष्टी लोकशाहीला घातक आहेत. झेड सुरक्षा असलेल्या सोमय्यांवर हल्ला झाला ही गंभीर बाब आहे, असेही दरेकर म्हणाले.

(हेही वाचा – महाराष्ट्रात पुन्हा होणार मास्कसक्ती? काय म्हणाले आरोग्यमंत्री, वाचा…)

पोलिसांच्या उपस्थितीत सोमय्या यांच्यावर हल्ला झालेला असताना पोलीस आयुक्त विचारतात की सीआएसएफचे जवान काय करत होते. सीआयएसएफ जवानांनी तेव्हा गोळीबार करावा आणि महाराष्ट्र पोलीस व सीआयएसएफ जवानांमध्ये तुंबळ युद्ध व्हावे, अशी पोलीस आयुक्तांची अपेक्षा होती का? असा संतप्त सवाल दरेकर यांनी उपस्थित केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.