आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात स्पर्धेच्या जगात आपला ठसा उमटवणाऱ्या मराठी उद्योजकांना प्रोत्साहन देण्याकरता त्यांना अर्थसंकेत प्रस्तुत डिजिटल इंडिया पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करते. हा पुरस्कार वितरण सोहळा २९ एप्रिल रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील मादाम कामा सभागृहात होणार आहे.
मागील सहा वर्षांपासून पुरस्काराचे वितरण
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डीसीबी बँकेचे डिजिटल व टेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख प्रसन्न लोहार, एमईपीएल समूहाचे सर्वेसर्वा सुधीर म्हात्रे उपस्थित राहणार आहेत. यावेळी विशेष अतिथी म्हणून राष्ट्रसंचार वर्तमानपत्राचे संपादक अनिरुद्ध बडवे व डिजिटल बिझनेस कोच जोतिराम सपकाळ उपस्थित राहणार आहेत. अर्थसंकेतचे संस्थापक डॉ. अमित बागवे व सह संस्थापक रचना बागवे यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाची निर्मिती झाली आहे. मागील सहा वर्षांपासून हा कार्यक्रम होत आहे.
(हेही वाचा ‘झुकेगा नही’ म्हणणाऱ्या शिवसैनिक आजी म्हणतात ‘घर देता का घर’!)
कोण आहेत पुरस्कारविजेते?
- बेस्ट ऑनलाईन न्यूजपेपर – ‘हिंदुस्थान पोस्ट’ न्यूज पोर्टल
- बेस्ट डिजिटल न्यूज चॅनेल – ‘कोकण नाऊ’ चॅनल
- बेस्ट ऑनलाईन इनिशिएटिव्ह इन आंत्रप्रेनरशिप – ‘ऑनलाईन स्वराज्य’
- बेस्ट आंत्रप्रेनअर युट्युब चॅनेल – ‘प्रोग्रेसिव्ह इंडिया वेब टीव्ही’
- बेस्ट डिजिटल शेअर मार्केट अकॅडेमी – ‘शंभूराज खामकर ट्रेडिंग अकॅडेमी’
- बेस्ट बिझनेस कोच पुरस्कार – दिनेश सिंघल
- बेस्ट क्रिएटिव्ह मार्केटिंग एजेन्सी – मैत्र एंटरटेनमेंट
- बेस्ट डिजिटल न्यूजपेपर – समृद्ध व्यापार