गणेश नाईकांना तूर्त दिलासा नाही, अटकपूर्व जामिनावर गुरूवारी होणार निर्णय

145

भाजपाचे आमदार गणेश नाईक यांच्यावर एका महिलेने बलात्कार आणि धमकीचा आरोप होता. गणेश नाईक यांच्यावर गुन्हे दाखल असून बुधवारी झालेल्या सुनावणीत त्यांना दिलासा मिळालेला नाही. तर नाईक यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर गुरूवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे गणेश नाईक यांना अटक होणार की सुटका हे पहाणं महत्त्वाचे ठरणार आहे.

(हेही वाचा – मनसेची सभा होणारच! बाळा नादंगावरकर औरंगाबादमध्ये दाखल )

गणेश नाईक यांच्या वकीलांच्या आरोपानुसार नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणात भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर गुन्हा दाखल केला, असा आरोप करण्यात आला आहे. यावेळी राजकीय फायद्यासाठी नाईक यांच्याविरोधात खोट्या आरोपासह गुन्हा दाखल केल्याचा आरोप गणेश नाईकांचे वकील गुप्ते यांनी केला आहे. इतकेच नाही तर दोन वर्षापूर्वी पक्ष बदलल्याने नाईक यांना अडकवण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोपही नाईकांच्या वकिलांनी केला आहे. या महिलेने गणेश नाईकांवर अत्याचाराचे आरोप केले होते, या प्रकरणानंतर महिला आयोगाने दखल घेतली आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी या प्रकरणात तपास वेगाने करण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत.

काय म्हणाल्या रुपाली चाकणकर?

नवी मुंबई पोलीस ठाण्यात गणेश नाईक यांच्याविरोधात आयपीसी 506 ब अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. 16 एप्रिलला नेरुळ पोलीस ठाण्यात आयपीसी 376 अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. दोन्ही पोलीस ठाण्याला दाखल झालेले गुन्हा हे गंभीर स्वरुपाचे असून गणेश नाईक यांना अटक करुन पुढील कारवाई केली जाईल, असे रुपाली चाकणकर यांनी सांगितले आहे. एका महिलेसोबत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर झालेल्या अपत्याचा स्वीकार न करणारे भाजप नेते आणि आमदार गणेश नाईक यांच्यावर पीडितेच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसापूर्वी या महिलेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती, त्याप्रकरणी आयोगाने नवी मुंबई पोलिसांना यावर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.