ज्या राज्य सरकारी परिवहन महामंडळाच्या कामगारांच्या संपामुळे वकील गुणरत्न सदावर्ते यांना जेलची हवा खावी लागली, त्या सदावर्ते यांची १८ दिवस कारागृहात राहून बाहेर आल्यावर बुधवारी, २७ एप्रिल रोजी एसटी कामगारांची पुन्हा भेट झाली आहे. कारण सदावर्ते तुरुंगातून बाहेर पडताच दुसऱ्याच दिवशी त्यांची एसटीच्या कामगारांसोबत भेट झाल्यामुळे आता वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे.
एसटी कामगारांचा पुन्हा संघर्ष?
सदावर्ते हे जेव्हा कारागृहातून बाहेर पडले होते, तेव्हा त्यांनी माध्यमांशी बोलताना थेट दावा केला की, राज्य परिवहन महामंडळाचे कामगार हे केवळ आपल्या आदेशामुळेच पुन्हा कामावर रुजू झाले आहेत, असे म्हणाले. आपण तुरुंगातून आदेश दिला त्यामुळे कामगार पुन्हा कामावर हजर झाले. त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून मी हा आदेश दिला होता. मात्र एसटीच्या कामगारांसाठीचा लढा आपला सुरूच राहणार आहे. यापुढे एसटीच्या बँकेचा लढा आपला सुरु असणार आहे, असे संकेतही सदावर्ते यांनी दिले आहेत. सदावर्ते यांनी केलेले वक्तव्य यावरुन भविष्यात एसटीच्या कामगारांचा संघर्ष सुरूच राहणार आहे. त्यांचे नेतृत्व सदावर्ते करतील का, अशी शंका निर्माण झाली होती. बुधवारी त्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. कारण सदावर्ते आणि एसटीचा कामगारांची पुन्हा भेट झाली आहे.