पूर्व उपनगरांतील नाल्यांवर अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांची नजर

129

पूर्व उपनगरांमधील ६ विभागांमध्ये सुरु असलेल्या नालेसफाई कामांची पाहणी महापालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी केली. या नालेसफाईची कामे प्रगतीपथावर असून सफाईचे कामयोग्यप्रकारे होत असल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. नालेसफाईनंतर काढण्यात आलेला गाळ हा ठरलेल्या वेळेतच हलविण्याचे निर्देश भिडे यांनी महानगरपालिकेच्या संबंधीत अधिका-यांना दिले आहेत. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम खाते, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांच्या अखत्यारितील नाल्यांच्याबाबत ज्या ठिकाणी अद्याप कामे सुरु झालेली नाहीत किंवा अपूर्ण आहेत, अशाप्रकरणी तातडीने ही काम मार्गी लावण्याबाबत संबंधितांशी पत्रव्यवहार व आवश्यक ती कार्यवाही प्राधान्याने करावीत, असेही निर्देश त्यांनी परिमंडळीय उपायुक्तांना दिले आहेत.

( हेही वाचा : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहते भाड्याच्या घरात )

पावसाळी पूर्व कामांचा प्रत्यक्ष व सांख्यिकीय आढावा

मुंबईतील पूर्व उपनगरांमध्ये परिमंडळ – ५ मधील ‘एल’ विभाग, ‘एम पूर्व’ विभाग व ‘एम पश्चिम’ विभाग; या ३ विभागांचा; तर ‘परिमंडळ – ६’ मध्ये ‘एन’, ‘एस’ व ‘टी’ या ३ विभागांचा समावेश होतो. या ‘परिमंडळ – ५’ मध्ये ६९ मोठे नाले तर ३६० छोटे नाले आहेत, तर ‘परिमंडळ – ६’ मध्ये ४५ मोठे नाले तर ३३० छोटे नाले आहेत. या व्यतिरिक्त दोन्ही परिमंडळांमध्ये रस्त्यालगतच्या पर्जन्य जलवाहिन्या व कल्व्हर्ट (मोरी) देखील आहेत. या सर्व ठिकाणी सुरु असलेल्या पावसाळी पूर्व कामांचा प्रत्यक्ष व सांख्यिकीय आढावा बुधवारी अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यांनी घेतला. यावेळी त्यांनी कांजूरमार्ग येथील मालमोटारीचे व त्यातील सामानाचे वजन मोजणा-या वजनकाट्याची व तेथील कार्यपद्धतीची पाहणी देखील केली.

New Project 4 20

या पाहणी दौ-यादरम्यान ‘परिमंडळ – ५’ चे उप आयुक्त व ‘परिमंडळ – ६’ चे प्रभारी उप आयुक्त विश्वास शंकरवार, एम पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त महेंद्र उबाळे, ‘एम पश्चिम’ विभागाचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे, ‘एल’ विभागाचे सहाय्यक आयुक्त महादेव शिंदे, ‘एन’ विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय सोनावणे, ‘एस’ विभागाचे सहाय्यक आयुक्त अजितकुमार आंबी, ‘टी’ विभागाचे सहाय्यक आयुक्त चक्रपाणी अल्ले, पर्जन्य जलवाहिन्या खात्याचे अभियंता, संबंधीत अभियंता वर्ग आणि महानगरपालिकेचे संबंधीत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.