हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे उद्धाटन होण्यापूर्वीच पुन्हा एक दुर्घटना घडली आहे. आठवड्याभरातील ही दुसरी दुर्घटना आहे. चार दिवसांपूर्वीच महामार्गावरील सोळाव्या नंबरचा ओव्हरपासचा आर्च कोसळून दुर्घटना घडली होती. उद्धाटन लवकर व्हावे, म्हणून समृद्धी महामार्गावर निकृष्ठ दर्जाचे काम सुरु आहे असा आरोप केला जात आहे.
27 एप्रिल (बुधवारी) समृद्धी महामार्गावरील एक निर्माणाधीन पुलाचा काही भाग अचानक कोसळला. पुलाचा हा भाग थेट एका ट्रेलरवर कोसळला. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी तेथे कुठलाही मजूर उपस्थित नव्हता आणि त्यामुळे जीवितहानी झाली नाही.
बांधकामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित
चार दिवसांपूर्वी देखील एक दुर्घटना घडली होती. महामार्गावर वन्यजीवांसाठी ओव्हरपास बांधण्यात आले आहेत. वन्यजीन उन्नत मार्ग कोसळल्याने यात एका मजूराचा मृत्यू झाला, तर दोन गंभीर जखमी झाले. नागपूरपासून 36 किलोमीटरवर असणारा पहिलाच आर्च ओव्हर ब्रिज कोसळला आहे. या मार्गावर असे 105 वन्यजीव उन्नत मार्ग तयार करण्यात आले. त्यामुळे त्या सर्व वन्यजीव उन्नत मार्गाच्या कामाच्या दर्जाचे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
( हेही वाचा: पेट्रोल वाचवण्याच्या या भन्नाट टिप्स तुम्हाला माहिती आहेत का? )
लोकार्पण पुढे ढकलण्यात आले
या दुर्घटनेनंतर बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण लांबणीवर टाकण्यात आले आहे. राज्य सरकारने प्रसिद्धी पत्रक काढत म्हटले, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या 15 व्या किलोमीटरमध्ये वन्यजीन उन्नत मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. वन्यजीव उन्नत मार्ग पूर्ण झाल्याशिवाय महामार्ग वाहतुकीसाठी खुला करता येणार नाही. त्यामुळे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शेलू बाजार दरम्यानच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पुढे ढकलण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community