वाढत्या महागाईमुळे सर्वच वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. सामान्य नागरिकांचे महागाईने कंबरडे मोडले आहे. आता या महागाईची झळ रस्त्यावरील खाद्यपदार्थांनाही पोहोचली आहे. खाद्यतेल, आणि व्यावसायिक सिलिंडरचे दर आवाकाच्या बाहेर जात असल्याने, वडापाव, समोसा, इडली, डोसा, मिसळ अशा नियमित खाल्ल्या जाणा-या खाद्यपदार्थाचे दर 5 ते 10 रुपयांनी वाढले आहेत.
सर्वसामान्यांच्या खिशाला झळ
मुंबई आणि आसपासच्या उपनगरात अनेक नागरिक कधी भुकेसाठी, कधी चवीसाठी तर कधी निव्वळ मजेसाठी वडापावचे सेवन करतात. सध्या अनेक कामाच्या ठिकाणी सकळी नाष्ट्यासाठी इडली, डोसा, मिसळ, समोसे स्वस्त असल्याने खाल्ले जातात. त्यानंतर टपरीवर मिळणारा चहा चवीने घेतला जातो. पण आता मात्र दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार आहे.
( हेही वाचा: समृद्धी महामार्गावर निकृष्ठ दर्जाचे काम होत असल्याचा आरोप, निर्माणाधीन पुल कोसळला!)
का घेण्यात आला निर्णय?
मागच्या काही दिवसांपासून खाद्यतेलाच्या आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत दुपटीने वाढ झाली आहे. पाम तेलसुद्धा 160 ते 180 रुपये लिटर झाले आहे. यामुळे आता रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या किंमती वाढत आहेत. आधी 10 ते 12 रुपयाला मिळणारा वडापाव 15 ते 18 रुपयांवर पोहोचला आहे. तसेच, इडली आणि मिसळ यांच्या दरातही 5 ते 10 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community