मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्याचे ठाकरे सरकारला अल्टिमेटम दिले आहे. त्याचे पडसाद महाराष्ट्रासह इतरही राज्यांत उमटताना दिसत आहेत. उत्तर प्रदेशात मशिदींवरील भोंगे उतरवल्याबद्दल राज ठाकरे यांनी आता योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर त्यांनी ठाकरे सरकारला जोरदार टोलाही लगावला आहे.
राज ठाकरेंचं ट्वीट
राज ठाकरे यांनी ट्वीट करत उत्तर प्रदेशातील योगी सरकारवर स्तुतीसुमने उधळली आहेत. उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषतः मशिदींवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचे अभिनंदन आणि आभार. आमच्याकडे महाराष्ट्रात ‘योगी’कुणीच नाही, आहेत फक्त ‘भोगी’!महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी मिळो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारवर झणझणीत टीका केली आहे.
#Azaan #Loudspeakers pic.twitter.com/Z6sCSPwJdK
— Raj Thackeray (@RajThackeray) April 28, 2022
(हेही वाचाः पवार आणि राष्ट्रपती राजवटीचं ‘हे’ आहे जूनं ‘कनेक्शन’, महाराष्ट्रात त्याचं पुन्हा होणार ‘दर्शन’?)
भोंग्यांबाबत योगी सरकारची नियमावली
- माइक, साऊंड सिस्टमचा वापर केला जावा, परंतु त्यांचा आवाज धार्मिक परिसराच्या बाहेर जाणार नाही, याची काळजी घ्यावी.
- आवाजाचा कुठलाही त्रास अन्य लोकांना होता कामा नये.
- नवीन स्थळांवर लाऊडस्पीकर लावण्यासाठी परवानगी घ्यावी.
- कुठल्याही परवानगीशिवाय शोभायात्रा किंवा जुलूस काढू नये, परवानगी देण्यापूर्वी शांतता आणि सलोखा राखला जाईल, यासाठी प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल.
- जेव्हा पारंपारिक सण, उत्सव आहेत किंवा धार्मिक यात्रा आहेत तेव्हाच परवानगी दिली जाईल. अनावश्यक कारणासाठी परवानगी दिली जाणार नाही.
(हेही वाचाः योगी आदित्यनाथ यांच्या आवडत्या बुल्डोझरच्या जन्माची कथा)
मनसेची सभा होणारच…
1 मे रोजी औरंगाबाद येथे होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेला काहीच दिवस बाकी आहेत. पण अजूनही पोलिसांनी या सभेला परवानगी दिलेली नाही. त्यामुळे ही सभा होणार की नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे. असे असतानाही आम्ही पोलिसांची भेट घेऊन रितसर परवानगी मागणार आहोत आणि पोलिसांकडून देखील या सभेला निश्चित परवानगी देण्यात येईल, असा विश्वास बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केला आहे.
Join Our WhatsApp Community