मातोश्री बंगल्या बाहेर हनुमान चालीसा म्हणण्याचा हट्ट धरल्याप्रकरणी राणा दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली, सध्या त्यांना १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. न्यायालयीन कोठडीत ५ दिवस घालवल्यावर आता राणा दाम्पत्याला जेलचे जेवण नकोसे वाटत आहे. त्यामुळे त्यांनी घरचे जेवण मिळावे, अशी मागणी न्यायालयात केली आहे.
शनिवारी होणार सुनावणी
आमदार नवनीत राणा खासदार रवी राणा यांनी हनुमान चालीसा म्हणण्याचा केलेला निर्धार आणि त्यानंतर राज्य सरकारच्या यंत्रणेलाच आव्हान दिल्याच्या आरोपाखाली राणा दाम्पत्यावर भारतीय दंड संहितेतील १२४-अ हे राजद्रोहाचे अत्यंत गंभीर कलम लावण्यात आले आहे. राणा दाम्पत्य सध्या कोठडीत आहेत. जामीन मिळेपर्यंत नवनीत राणा भायखळा तुरुंगात तर रवी राणा ऑर्थर रोड तुरुंगात असणार आहेत. कारागृहात घरचे जेवण मिळावे, यासाठी राणा दाम्पत्याने न्यायालयात अर्ज केल्याची माहिती मिळाली आहे. राणा दाम्पत्याला वांद्रे न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी शनिवारी सुनावणी होणार आहे. त्यामध्ये राज्य सरकारच्या वतीने वकील प्रदीप घरत बाजू मांडतील तर वकील रिझवान मर्चट राणा दाम्पत्याची बाजू मांडणार आहेत. पुढील सुनावणीपूर्वी राणा दाम्पत्याने घरचे जेवण मिळावे, म्हणून अर्ज केला आहे.
(हेही वाचा एसटी धावली, उत्पन्नात कोटीच्या घरात पोहचली!)
Join Our WhatsApp Community