परप्रांतीय विरोधक अशी प्रतिमा पुसण्याचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून जोरदार प्रयत्न सुरू आहे. राज ठाकरे हे ५ मे रोजी आयोध्यामध्ये जाणार आहेत. त्याआधी ४ मे रोजी ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेण्याची शक्यता आहे. ही भेट घेऊन राज ठाकरे पुढील राजकारणाबाबत अचूक वेळ साधणार असल्याचे बोलले जात आहे.
योगी आदित्यनाथ यांचे केले कौतुक
धार्मिक स्थळांवरुन विशेषत: मशिदींवरुन भोंगे काढण्याबाबत मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर राज्यासह देशभरात वातावरण तापले. उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारने धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे राज ठाकरेंनी कौतुक केले. उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार, असे राज ठाकरे यांनी ट्विट करत सांगितले. आमच्याकडे महाराष्ट्रात योगी कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे भोगी आहेत. महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी मिळो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना असे ट्विट राज ठाकरे यांनी केले आहे. राज ठाकरेंनी योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केल्यानंतर त्याची चर्चा राज्यासह देशभरात होत आहे. या निर्णयाबद्दल आता राज ठाकरे योगींची भेट घेऊन अभिनंदन करणार असल्याची चर्चा आहे.
(हेही वाचा सरकारी मेगाभरती! अडीच लाख रिक्त पदे भरणार)
Join Our WhatsApp Community