महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबद सभेला अखेर औरंगाबाद पोलिसांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे १ मे रोजी मनसेची सभा निश्चित होणार आहे. पोलिसांनी गुरुवारी, २८ एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजता यासंबंधी माहिती दिली. मात्र या सभेला पोलिसांनी अटी – शर्ती घालून दिल्या आहेत.
सुरक्षेची केली तयारी
औरंगाबादेतील मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर मनसेच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. पोलिसांकडून देखील या सभेच्या दिवसाकरता बंदोबस्ताचा प्लान तयार करण्यात आला आहे. औरंगाबादेत १ मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रत्युत्तर सभा होणार आहे. प्रत्युत्तर सभेची मनसेकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. औरंगाबाद शहरात सगळीकडे मनसेचे झेंडे लावण्याची आणि कार्यक्रम पत्रिका घरोघरी वाटपाची मनसैनिकांनी तयारी सुरू केली आहे.
अयोध्येतून देखील अडीच हजार कार्यकर्ते येणार
राज ठाकरे यांच्या या सभेसाठी अयोध्येतून अडीच हजार कार्यकर्ते दाखल होणार असल्याचे राजसभा ही रेकॉर्डब्रेक होणार असून या सभेसाठी अयोध्येतून देखील अडीच हजार कार्यकर्ते येणार आहेत, आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत. दरम्यान, राज ठाकरे यांच्या या सभेसाठी केवळ मराठवाडा, महाराष्ट्रच नाही तर थेट अयोध्येतून देखील राज समर्थक येणार असल्याची माहिती दिलीप धोत्रे यांनी यावेळी दिली आहे. राज ठाकरेंच्या सभेची पुर्वतयारी व पदाधिकाऱ्यांच्या बैठकांसाठी मनसेचे नेते बाळा नांदगांवकर, नितीन सरदेसाई व दिलीप धोत्रे हे औरंगाबादेत दाखल झाले आहेत.
Join Our WhatsApp Community